अस्सा नवरा सुरेख बाई! रेड कार्पेटवर चालताना अनुष्का शर्माचा ड्रेस हिल्समध्ये अडकला, मग विराटनं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:18 IST2023-03-24T15:07:32+5:302023-03-24T15:18:42+5:30
विराट कोहलीच्या कृतीनं सगळ्यांची मनं जिंकली, नेटिझन्स त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.

अस्सा नवरा सुरेख बाई! रेड कार्पेटवर चालताना अनुष्का शर्माचा ड्रेस हिल्समध्ये अडकला, मग विराटनं...
विराट कोहली (Virat Kohli)आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच सोशल मीडियावर कपल गोल सेट करताना दिसतात. खरं तर, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली इंडियन स्पोर्ट्स ऑनर अवॉर्ड्स नाईटमध्ये एकत्र आले होते. मीडियासमोर अनेक रोमँटिक पोझ देताना दोघांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. मिलियन डॉलर स्माईलसह, अनुष्का शर्मा विराट कोहलीचा हात धरताना दिसली. कॅमेऱ्याला रोमँटिक पोझ दिल्यानंतर, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली इव्हेंटच्या दिशेने चालत लागताच विराट कोहलीने असे काही केले की सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरला. विराट कोहलीच्या परफेक्ट नवऱ्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या व्हिडीओत विराट आणि अनुष्का हे त्या कार्यक्रमासाठी दाखल झाल्याचे दिसत आहेत. तसेच ते फोटोग्राफर्सला पोज देताना दिसत आहेत. यावेळी रेड कार्पेटवर चालत असताना अनुष्काचा ड्रेस हा तिच्या हिल्समध्ये अडकत असल्याचे विराटच्या लक्षात आले. ते पाहून त्याने अनुष्काला थांबवले आणि तिचा ड्रेस नीट केला. विराटची ही कृती पाहून अनुष्काने त्याला थँक्यू असे म्हटले.
विराट कोहलीचा जेंटलमनवाला अंदाज पाहून त्याचे चाहते त्याच्यावर फिदा झाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये विराट कोहली आणि अनुष्काचे चाहते त्यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक करताना थकत नाहीत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, बेस्ट आणि क्युटेस्ट कपल. तर तिथे आणखी एका यूजरने ग्रेट मॅन खूप आदर. एका चाहत्याने कमेंट करताना लिहिलं की ट्रू जेंटलमन...
2023 मध्ये अनुष्का शर्मा तिच्या होम प्रॉडक्शन चित्रपट 'चकडा एक्सप्रेस' मधून ओटीटी पदार्पण करणार आहे. क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान महिला वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.