अनुष्का म्हणते,‘ रणबीर म्हणजे आॅल इंडिया रेडिओ ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 19:01 IST2016-12-25T19:01:02+5:302016-12-25T19:01:02+5:30

अनुष्का शर्मा ही आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. तिला ‘सुल्तान’ आणि ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटासाठी नुकताच ...

Anushka says, 'Ranbir is All India Radio' | अनुष्का म्हणते,‘ रणबीर म्हणजे आॅल इंडिया रेडिओ ’

अनुष्का म्हणते,‘ रणबीर म्हणजे आॅल इंडिया रेडिओ ’

ुष्का शर्मा ही आव्हानात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. तिला ‘सुल्तान’ आणि ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटासाठी नुकताच ‘स्टारडस्ट बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अ‍ॅवॉर्ड’ ही मिळालाय. सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार या ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अनुष्काला मिळाली. सर्वांसोबत तिची उत्तम केमिस्ट्री जमली पण, शाहरू ख खान आणि रणबीर कपूर यांच्यासोबतची बाँण्डिंग तिला तिच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची वाटते. रणबीरला ती ‘आॅल इंडिया रेडिओ’ म्हणते, तर शाहरूखसोबत तिने तिचे संपूर्ण आयुष्य शेअर केले असल्याचे कबूल केलेय. 



ती म्हणते,‘रणबीर आणि माझ्यात असलेली मैत्री ही खोडकर स्वरूपाची आहे. तर शाहरूखसोबत तसे नाही. आम्ही तात्विक पातळीवर जाऊन एकमेकांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतो. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा बी टाऊनविषयी न बोलता खासगी आयुष्याबद्दल बोलतो. आयुष्यातील अनुभव, घडामोडी, शिकवण यांच्याविषयी आम्ही बोलत असतो. त्याने माझ्या आयुष्यातील अनेक अडचणी संपवल्या आहेत. 


Web Title: Anushka says, 'Ranbir is All India Radio'