म्हणून अनुष्का शर्माने विराट कोहलीशी वयाच्या 29व्या वर्षी केलं लग्न, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 11:58 IST2019-07-16T11:58:48+5:302019-07-16T11:58:57+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी 2017मध्ये विवाह केला. दोघांनी इटली  सीक्रेट मॅरेज केले.

Anushka and virat got married at the age of 29 because of this reason | म्हणून अनुष्का शर्माने विराट कोहलीशी वयाच्या 29व्या वर्षी केलं लग्न, स्वत: केला खुलासा

म्हणून अनुष्का शर्माने विराट कोहलीशी वयाच्या 29व्या वर्षी केलं लग्न, स्वत: केला खुलासा

ठळक मुद्देसुमारे चार वर्षं डेट केल्यावर दोघांनी लग्न केले होते

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी 2017मध्ये विवाह केला. दोघांनी इटली  सीक्रेट मॅरेज केले. अनुष्का आणि विराटने आपले प्रेमही अनेक वर्षं जगापासून लपवून ठेवले होते. सुमारे चार वर्षं डेट केल्यावर दोघांनी लग्न केले होते. पण या रिलेशनशिपची कुणाला कल्पना देखील नव्हती. त्यामुळेच दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.


ज्यावेळी अनुष्काने लग्न केले तेव्हा ती 29 वर्षांची होती. नुकत्याच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का म्हणाली, मला वाटले 30 वर्षांच्या आत लग्न केले पाहिजे. प्रेक्षक आपल्या इंडस्ट्रीपेक्षा जास्त समजूतदार आहेत. त्यांना फक्त कलाकारांना टिव्हीवर बघायचे असते. त्याना तुमचं लग्न झालेले आहे नाही किंवा तुम्ही आई आहेत याच्याशी काही घेणदेण नसतं. आपल्याला या मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे. मी 29 व्या वर्षी लग्न केले कारण मी प्रेमात होते आणि अजूनही आहे. मी नेहमीच स्त्रींच्या सन्मान करते आणि  मी खूश आहे की इंडस्ट्रीतील बऱ्याच अभिनेत्रींनी लग्न केले आहे.   


अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी २०१३ मध्ये सुरू झाली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहीरातीसाठी एकत्र कास्ट केले होते. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरू झाली. पुढे याच मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगू लागले. 

Web Title: Anushka and virat got married at the age of 29 because of this reason