हीच ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया; मिळाली होती अश्लिल धमकी; एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 12:32 IST2019-05-27T12:31:08+5:302019-05-27T12:32:24+5:30

अलीकडे एका ट्रोलरने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली होती. यानंतर अनुरागने थेट ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले होते.

anurag kashyap files fir against the troll who threatened to rape his daughter | हीच ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया; मिळाली होती अश्लिल धमकी; एफआयआर दाखल

हीच ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया; मिळाली होती अश्लिल धमकी; एफआयआर दाखल

ठळक मुद्देआलिया तिच्या इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हलिंग, पार्टी आणि तिच्या मित्रांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करीत असते.

अलीकडे एका ट्रोलरने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीला  अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली होती. यानंतर अनुरागने थेट ट्रोलरने लिहिलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे लक्ष वेधले होते. माझ्या मुलीला धमक्या देत तुमच्या विजयाचा आनंद साजरा करणा-या समर्थकांशी तुम्ही कसे निपटणार, प्लीज मला सांगा, असे ट्वीट  अनुरागने केले होते. आता याप्रकरणी अनुरागने एफआयआर दाखल केला आहे.  शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्याने स्वत:च ही माहिती दिली.




मी मुंबई पोलिस, महाराष्ट्र सायबर आणि ब्रजेश सिंह यांचे आभार मानू इच्छतो. एफआयआर दाखल करण्यासाठी मदत केल्याबद्दल आभार. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी सर आभार. एक पिता या नात्याने आता अधिक सुरक्षित वाटू लागले आहे, असे ट्वीट अनुरागने केले आहे.




नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मोदी समर्थकांनी लगेच अनुरागला ट्रोल करणे सुरु केले होते. याचदरम्यान स्वत:ला मोदी समर्थक म्हणवणा-या एका युजरने थेट अनुरागच्या मुलीला लक्ष्य करत, तिला अतिशय अश्लिल भाषेत धमकी दिली होती. अनुरागच्या मुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करताना मोदी समर्थक म्हणवणा-या या युजरने धमकीवजा अश्लिल कमेंट लिहिली होती. अनुरागने या धमकीच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट शेअर करत, थेट नरेंद्र मोदी यांचे या सगळ्याकडे लक्ष वेधले होते.  त्याच्या संबंधित ट्वीटनंतर अनेकंदानी त्याला सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. 

अनुरागच्या मुलीचे नाव आलिया आहे. बी-टाउनमध्ये पॉप्युलर स्टार डॉटर्स म्हणून आलियाला ओळखले जाते. इन्स्टाग्रामवर तर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे अकाउंट स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. आलिया रणबीर कपूरची मोठी चाहती आहे.

आलियाने एका फॅशन पोर्टलला मॉडलिंगही केले आहे. सध्या आलिया अमेरिकेतील एका स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी खुशी कपूर आणि आलिया खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. आलियाने इन्स्टाग्रामवर खुशीसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

आलिया तिच्या इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हलिंग, पार्टी आणि तिच्या मित्रांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करीत असते. फोटोवरून आलिया एक स्टार मटेरिअल आहे, हे स्पष्ट होते. 

Web Title: anurag kashyap files fir against the troll who threatened to rape his daughter