'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनसोबत नाही तारा सुतारियाची वर्णी, दिग्दर्शकाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:13 AM2023-10-25T10:13:02+5:302023-10-25T10:16:50+5:30

कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया नुकतेच एका डिनर डेटवर एकत्र स्पॉट झाले होते.

Anurag basu reacted on rumours of tara sutaria lead role opposite kartik aaryan in aashiqui 3 | 'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनसोबत नाही तारा सुतारियाची वर्णी, दिग्दर्शकाचा खुलासा

'आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनसोबत नाही तारा सुतारियाची वर्णी, दिग्दर्शकाचा खुलासा

कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया नुकतेच एका डिनर डेटवर एकत्र स्पॉट झाले होते. दोघांच्या व्हायरल झालेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा रंगल्या. इतकंच नाही तर दोघे 'आशिकी ३'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार अशा बातम्याही समोर आल्या. मात्र आता यावर 'आशिकी ३' च्या दिग्दर्शकाने मौन सोडलं आहे. 

तारा सुतारिया आणि कार्तिक आर्यनचे व्हायरल झालेले फोटो पाहून असा अंदाज बांधला जात होता की ही 'आशिकी 3'ची प्रमोशनल स्ट्रॅटेजी असू शकते आणि तारा या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून येऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अनुराग बासूने सांगितले की चित्रपटातील मुख्य नाव निश्चित झालेले नाही.  

'आशिकी ३'चे दिग्दर्शक अनुराग बसू आणि निर्माते मुकेश भट्ट यांनी या बातम्यांना पूर्णपणे अफवा असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत अनुरागने सांगितले की, चित्रपटाची अभिनेत्री अजून ठरलेली नाही.

1990 साली रिलीज झालेला ‘आशिकी’ हा सिनेमा महेश भट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट इतका गाजला होता की अनु व राहुल रॉय एका रात्रीत स्टार झाले होते. या चित्रपटाची गाणी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. 2013 मध्ये ‘आशिकी 2’ हा सिनेमा आला. मोहित सूरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर व आदित्य रॉय लीड रोलमध्ये होते. हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला होता. आता कार्तिकचा ‘आशिकी 3’ बॉक्स ऑफिसवर काय जादू करतो, ते बघूच.

Web Title: Anurag basu reacted on rumours of tara sutaria lead role opposite kartik aaryan in aashiqui 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.