"आजकाल बायकाच पतीसाठी धोकादायक...", अनुपम खेर यांचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:56 IST2025-07-01T18:56:03+5:302025-07-01T18:56:42+5:30
बदलत्या नात्यांवर आणि रिलेशनशिपवर भाष्य करताना अनुपम खेर यांनी महिला पतीसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले अनुपम खेर? जाणून घेऊया.

"आजकाल बायकाच पतीसाठी धोकादायक...", अनुपम खेर यांचं वक्तव्य चर्चेत
अनुपम खेर हे सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आहेत. अभिनयासोबतच ते त्यांच्या परखड मतांसाठीही ओळखले जातात. सध्या देशात घडणाऱ्या विविध घटनांवरुन समाज हादरून गेला आहे. बदलत्या नात्यांवर आणि रिलेशनशिपवर भाष्य करताना अनुपम खेर यांनी महिला पतीसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले अनुपम खेर? जाणून घेऊया.
"सगळीकडे विचित्र लोक आहेत. हा फक्त भारतातील प्रॉब्लेम नाही. तर विकसित देशांमध्येही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे हे फक्त भारतासाठी मर्यादित नाहीये. सगळ्या प्रकारच्या गोष्टी सगळीकडे घडत असतात. आजच्या जगात बायकादेखील त्यांच्या पतीसाठी धोकादायक ठरत आहे. प्लॅनिंग करत आहेत, याची कल्पनाही करू शकत नाही. मला चर्चेचा विषय बनायचं नाही. पण, गोष्टी इतक्या वेगाने बदलत आहेत की कधी कधी हे समजून घेणं कठीण जातं", असं त्यांनी म्हटलं आहे.
"कौतुक करणं आणि इच्छा असणं यात फरक आहे. आपलं कौतुक व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण, आपल्याला आपल्या इच्छाही पूर्ण करायच्या असतात. काही वेळेस लोक फक्त तुमचं कौतुक करतात. पण, तुमच्या इच्छा ते पूर्ण करू शकत नाहीत", असंही त्यांनी पुढे म्हटलं. दरम्यान, अनुपम खेर 'तन्वी द ग्रेट' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. येत्या १८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासोबत सिनेमाचं दिग्दर्शनही अनुपम खेर यांनी केलं आहे.