"जगाचं ओझं खांद्यावर घेऊ नका..." अनुपम खेर यांचे नववर्षात खास संकल्प, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:42 IST2026-01-01T13:26:50+5:302026-01-01T13:42:10+5:30
अनुपम खेर यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खास संदेश दिलाय.

"जगाचं ओझं खांद्यावर घेऊ नका..." अनुपम खेर यांचे नववर्षात खास संकल्प, म्हणाले...
Anupam Kher New Year Resolution 2026 : सध्या नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मात्र २०२६ या वर्षाची सुरुवात एका अत्यंत खास आणि सकारात्मक संकल्पाने केली आहे. २०२५ या वर्षानं आपल्याला काय शिकवले आणि २०२६ मध्ये आपण स्वतःमध्ये कोणते बदल घडवणार आहोत, याबद्दल त्यांनी चाहत्यांना सांगितलंय.
अनुपम खेर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' पूर्वीचे ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "२०२५ मध्ये मी जे काही शिकलो ते २०२६ मध्ये माझ्या आयुष्यात लागू करण्याचा प्रयत्न असेल. कदाचित तुम्हालाही यातील काही गोष्टी उपयुक्त वाटतील. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! देव तुमचे जीवन आनंद आणि शांतीने भरो".
अनुपम खेर यांनी नवीन वर्षात काही खास संकल्प केले आहेत. त्यांच्या संकल्पातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाचा भार आपल्या खांद्यावर न घेता, स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. त्यांनी काही व्यावहारिक बदलही केले आहेत. अनुपम यांनी गरिबांना मदत करण्याचं ठरवलंय. विशेषतः भाजी विक्रेते किंवा छोट्या दुकानदारांशी मोलतोल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, "कोणालाही सुधारवण्याची जबाबदारी किंवा अधिकार आपल्याला नाही, त्यामुळे लोकांच्या चुका काढण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे", असं त्यांनी म्हटलं.
LIFE LESSONS FOR 2026: 😍🤓
— Anupam Kher (@AnupamPKher) January 1, 2026
हर गुज़रा हुआ साल कुछ न कुछ सीखा कर जाता है।और जो सीख हमें मिलती है! अगर हम उसे नये साल में लागू करें तो अच्छा होगा भी और शायद लगेगा भी। तो मैंने जो 2025 में सीखा, इसे मैं 2026 मैं अपनी ज़िंदगी में लागू करना चाहूंगा।इनमें से कुछ बातें शायद आपको भी… pic.twitter.com/ZPTxaRTqCE