ऐकलंत का? अनुप जलोटा शोधत आहेत जसलीनला साजेसा मुलगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:42 IST2019-02-14T11:45:58+5:302019-02-14T12:42:46+5:30

भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारु  या जोडीने ‘बिग बॉस 12’मध्ये धम्माल केली होती. बिग बॉसच्या घरातील या दोघांचे नाते चर्चेचा विषय बनले होते.

anup jalota searching boy for jasleen matharu bigg boss 12 | ऐकलंत का? अनुप जलोटा शोधत आहेत जसलीनला साजेसा मुलगा!

ऐकलंत का? अनुप जलोटा शोधत आहेत जसलीनला साजेसा मुलगा!

ठळक मुद्देखुद्द अनुप यांनीच घराबाहेर पडल्यावर जसलीन केवळ माझी शिष्या आहे. आम्ही केवळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक केले, असा खुलासा केला होता.

भजन सम्राट अनुप जलोटा आणि  जसलीन मथारु  या जोडीने ‘बिग बॉस 12’मध्ये धम्माल केली होती. बिग बॉसच्या घरातील या दोघांचे नाते चर्चेचा विषय बनले होते. याचे कारण म्हणजे, बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी या दोघांनी केलेला एक खुलासा. होय, गत तीन वर्षांपासून आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, हे सांगून अनूप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर अनेकांनी अनूप व जसलीन या दोघांची खिल्ली उडवली होती तर अनेकांनी नॅशनल टीव्हीवर स्वत:चे नाते कबुल करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले होती. अर्थात पुढे काही दिवसांतचं अनुप व जसलीन यांचे नाते केवळ बिग बॉससाठी केलेले एक नाटक होते, हे स्पष्ट झाले होते. खुद्द अनुप यांनीच घराबाहेर पडल्यावर जसलीन केवळ माझी शिष्या आहे. आम्ही केवळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक केले, असा खुलासा केला होता.  आता जसलीन व अनुप जलोटा यांच्याबद्दल एक ताजी बातमी आहे. ती म्हणजे, अनुप जलोटा स्वत: जसलीनसाठी एक मुलगा शोधत आहे.
होय, ताज्या मुलाखतीत स्वत: अनुप जलोटा यांनी  याबद्दल माहिती दिली. मी जसलीनसाठी एक मुलगा शोधतोय. जो तिच्यावर प्रेम करेल, तिच्यासोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा करेल, असे त्यांनी सांगितले. जसलीनबद्दल माझ्या मनात आदर आहे आणि असेल. आम्ही फक्त बिग बॉसचा टीआरपी वाढवण्यासाठी रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाटक केले होते, असेही त्यांनी सांगितले. आता अनुप जलोटा यांना जसलीनला साजेसा मुलगा कधी मिळतो ते बघूच.

Web Title: anup jalota searching boy for jasleen matharu bigg boss 12