"महाशिवरात्रीने व्हॅलेंटाइन डेचा नाश केला...", 'आशिकी' फेम अनु अग्रवालची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:42 IST2026-02-17T17:40:06+5:302026-02-17T17:42:55+5:30

अनु अग्रवालने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. व्हॅलेंटाइन डे आणि महाशिवरात्रीनिमित्त अनु अग्रवालने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली होती. 

anu agrawal said mahashivratri dissolve the valentines day | "महाशिवरात्रीने व्हॅलेंटाइन डेचा नाश केला...", 'आशिकी' फेम अनु अग्रवालची ती पोस्ट चर्चेत

"महाशिवरात्रीने व्हॅलेंटाइन डेचा नाश केला...", 'आशिकी' फेम अनु अग्रवालची ती पोस्ट चर्चेत

'आशिकी' सिनेमामुळे अभिनेत्री अनु अग्रवाल प्रसिद्धीझोतात आली होती. या सिनेमामुळे ती रातोरात स्टार झाली. अनु अग्रवाल आता सिनेइंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट्स देत असते. पण, अनु अग्रवालने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. व्हॅलेंटाइन डे आणि महाशिवरात्रीनिमित्त अनु अग्रवालने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली होती. 

या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की "व्हॅलेंटाईन डे हा प्रेम साजरं करण्यासाठीचा दिवस आहे. पण महाशिवरात्रीने त्याचा नाश केला. जेव्हा भक्ती जळून जाते आणि अहंकार शांत होतो, तेव्हा काय उरते? उपस्थिती. मेडिटेशन म्हणजे सुटका नाही. तर ते एक प्रकारे मेंटेनन्स आहे. जसे की तुमच्या शरीरातील सॉफ्टवेअर अपडेट करुन त्याला ड्रामा डिलीट करणे आणि जागृकता ठेवणे. प्रेम ही एक व्यक्ती नाही, ती एक अशी अवस्था आहे जी तुम्ही तुमच्यासोबत शांत, सावधपणे आणि निश्चिततेने तुमच्यासोबत घेऊन जाता. महादेव काय शिकवतात तर खोट्या गोष्टी नष्ट करा. शक्ती नेहमी सांगते की सत्य हीच खरी निर्मिती आहे. मी चमकत नाही. माझे पाय जमिनीवरच आहेत. परत आलीय, पण एका खोल जागेवरुन". 

अनु अग्रवाल ही ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आशिकी, द क्लाऊड डोअर, किंग अंकल, जनम कुंडली अशा सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. आशिकीनंतर ती प्रसिद्धीझोतात आली होती. मात्र नंतर एका अपघातामुळे तिचं करिअर उद्ध्वस्त झालं. त्या अपघातानंतर अनु अग्रवाल कोमामध्ये गेली होती. पण त्यानंतर तिने कमबॅक केलं. 

Web Title : महाशिवरात्रि पर 'आशिकी' फेम अनु अग्रवाल का पोस्ट चर्चा में।

Web Summary : 'आशिकी' अभिनेत्री अनु अग्रवाल का महाशिवरात्रि पोस्ट चर्चा में रहा। उन्होंने त्यौहार को अहंकार नष्ट करने और ध्यान के माध्यम से आंतरिक शांति खोजने से जोड़ा, वैलेंटाइन डे के साथ विपरीत। उन्होंने आत्म-जागरूकता और सत्य पर जोर दिया। एक समय की लोकप्रिय अभिनेत्री, एक दुर्घटना ने उनके करियर को पटरी से उतार दिया।

Web Title : 'Aashiqui' fame Anu Aggarwal's post on Mahashivratri sparks discussion.

Web Summary : 'Aashiqui' actress Anu Aggarwal's Mahashivratri post stirred debate. She linked the festival to destroying ego and finding inner peace through meditation, contrasting it with Valentine's Day. She emphasized self-awareness and truth. Once a popular actress, a past accident briefly derailed her career.