आर. माधवनला सोशल मीडियाद्वारे केले मुलीने प्रपोज, त्याने दिला हा क्यूट रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 18:04 IST2019-07-24T18:02:24+5:302019-07-24T18:04:28+5:30

माधवनच्या एका फॅनने त्याच्या फोटोवर कमेंट देताना चक्क त्याला प्रपोज केले आहे.

Another Madhavan Selfie Sends Internet Into A Spiral; Actor Responds To Fan Who Wants To Marry Him | आर. माधवनला सोशल मीडियाद्वारे केले मुलीने प्रपोज, त्याने दिला हा क्यूट रिप्लाय

आर. माधवनला सोशल मीडियाद्वारे केले मुलीने प्रपोज, त्याने दिला हा क्यूट रिप्लाय

ठळक मुद्देमी केवळ १८ वर्षांची आहे. पण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. माधवनने त्याच्या या फॅनला एक खूपच क्यूट रिप्लाय दिला आहे. त्याने रिप्लायमध्ये लिहिले आहे की, हा.. हा... हा... देव तुझे भले करो आणि तुला अतिशय चांगला मुलगा मिळो... 

आर. माधवनने बनेगी अपनी बात या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने साया, सी हॉक्स, घर जमाई यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. मालिकांमध्ये मिळालेल्या लोकप्रियतेनंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. त्याच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले. दक्षिणेतील सुपरस्टारमध्ये त्याची आज गणना केली जाते. त्याने बॉलिवूडमध्ये देखील रहना है तेरे दिल में, थ्री इडियट्स, साला खडूस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या अभिनयाइतकेच त्याच्या दिसण्यावर त्याचे फॅन्स फिदा आहेत. 

बॉलिवूडमधील हँडसम हिरोंमध्ये आर. माधवनची गणना केली जाते. त्याच्या महिला चाहत्यांची संख्या तर प्रचंड आहे. त्याला त्याचे फॅन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात आणि तो देखील आपल्या खाजगी आयुष्याविषयी, आगामी चित्रपटांविषयी त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे माहिती देतो. आर. माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिले आहे की, एडिटिंग करायला प्रचंड मजा येते. पण त्याचसोबत खूप थकायला पण होते. या गोष्टीचा मी आनंद लुटत आहे. पण मला याची भीती देखील वाटत आहे. आजचा प्रवासाचा दिवस संपला... नक्कीच मी आता म्हातारा होत आहे आणि त्यासोबतच त्याने रॉकेट्री द फिल्म असा हॅशटॅग दिला आहे. या फोटोत त्याच्या दाढीचे केस पिकलेले दिसत असले तरी तो खूपच हँडसम दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

माधवनच्या या फोटोवर त्याचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या प्रतिक्रियांमधील एका प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या एका फॅनने या फोटोवर कमेंट देताना चक्क माधवनला प्रपोज केले आहे. तिने लिहिले आहे की, मी केवळ १८ वर्षांची आहे. पण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. माधवनने त्याच्या या फॅनला एक खूपच क्यूट रिप्लाय दिला आहे. त्याने रिप्लायमध्ये लिहिले आहे की, हा.. हा... हा... देव तुझे भले करो आणि तुला अतिशय चांगला मुलगा मिळो... 


 

Web Title: Another Madhavan Selfie Sends Internet Into A Spiral; Actor Responds To Fan Who Wants To Marry Him