सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 12:38 IST2020-09-10T12:36:41+5:302020-09-10T12:38:38+5:30

सुशांतच्या निधनानंतर अंकिताला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर अंकितानेही हेटर्सना सोशल मीडियावर चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

Ankita Lokhande upset over being called Sushant's widow | सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल

सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. तसेच या प्रकरणानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेदेखील चर्चेत आली. ती सुशांतसोबत जवळपास सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होती. त्यानंतर त्या दोघांचे ब्रेकअप झाले. सुशांतच्या निधनानंतर अंकिताला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर अंकितानेही हेटर्सना सोशल मीडियावर चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.


अंकिताने सोशल मीडियावर खूप मोठी पोस्ट शेअर केली आहे. अंकिताने लिहिले की, मीडिया वारंवार मला विचारते की मला काय वाटतं ही आत्महत्या आहे की हत्या? हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की मी कधीच म्हटले नाही की ही हत्या आहे आणि यासाठी कोणता विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा मित्र सुशांतच्या न्यायाबद्दल म्हटले आहे आणि मी त्याच्या कुटुंबासोबत उभी आहे. तपास एजेंसीने सत्य समोर आणले पाहिजे.


माझा राज्य सरकार व पोलिसांवर विश्वास
अंकिताने म्हटले की, महाराष्ट्रीयन आणि भारतीय नागरिक असल्याच्या नात्याने माझा राज्य सरकार व पोलीस आणि केंद्रीय सरकारवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मला सर्वांसमोर विधवा आणि सावत्र अशा शब्दांचा वापर केला तेव्हादेखील त्यावर अजिबात उत्तर दिले नाही. मी फक्त 2016 पर्यंत सुशांत आणि त्याच्या मानसिक स्थितीबद्दल सांगण्यासाठी पुढे आली.

रिया चक्रवर्तीने कोर्टात सांगितलं, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटी करतात ड्रग्सचं सेवन....
 

अंकिताने रियावर साधला निशाणा
अंकिताने रियाचे नाव न घेता निशाणा साधला आहे आणि म्हटलं की तिने एका डिप्रेस व्यक्तीला ड्रग्स घ्यायला दिले पाहिजे होते का? कशी मदत केली जात होती? त्यावेळी ती सुशांतच्या जवळ होती. एकीकडे ती म्हणते की सुशांतच्या चांगल्यासाठी सर्व डॉक्टरांसोबत कोऑर्डिनेट करत होती. तर दुसरीकडे ती सुशांतसाठी ड्रग्स कोऑर्डिनेट करत होती.

'मी निरपराध, मला या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय'; रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

हे तिचे कर्म
अंकिता पुढे म्हणाली की, तिच्यानुसार, तिने सुशांतच्या कुटुंबाला ट्रिटमेंटबद्दल सांगितले होते. पण सुशांत ड्रग्स घेतो, हे सांगितले होते का? मला विश्वास आहे की असे झाले नसेल कारण कदाचित ती हे एन्जॉय करत होती आणि त्यामुळे मला वाटते की हे कर्म आहे. 

रियाच्या जामिनावर आज सुनावणी

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज अँगल सापडल्यानंतर चौकशी दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली. रियाला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तिची रवानगी भायखळ्यातील महिलांच्या जेलमध्ये करण्यात आली आहे. रियाने जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात अर्ज केला आहे.

Web Title: Ankita Lokhande upset over being called Sushant's widow