‘जरा तर लाज बाळग...’; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 18:39 IST2022-02-06T18:33:02+5:302022-02-06T18:39:45+5:30
Ankita Lokhande Trolled : होय, एकीकडे संपूर्ण देश लतादीदींना श्रद्धांजली वाहत असताना दुसरीकडे अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले.

‘जरा तर लाज बाळग...’; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल
भारतरत्न लता मंगेशकर ( Lata Mangeshkar)यांच्या निधनाने अख्खा देश शोकाकुल आहे. आज रुग्णालयात उपचार सुरू असतानाच लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. जगभरातील सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली देत आहेत. पण यादरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande ) असा काही ‘प्रताप’ केला की, नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला. यानंतर अंकिता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली.
होय, एकीकडे संपूर्ण देश लतादीदींना श्रद्धांजली वाहत असताना दुसरीकडे अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. लता यांच्या निधनानंतर तासाभरात तिने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. या व्हिडीओमध्ये अंकिता पती विकी जैनसोबत कारमध्ये ‘बिजली बिजली’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
एकीकडे लतादीदींच्या निधनावर संपूर्ण देश शोक करत असताना अंकिताचं हे उथळ वागणं पाहून पाहून युजर्स खवळले. मग काय, नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. ‘अरे काही तर लाज बाळग, हे सर्व उद्याही करू शकतेस,’असं एका युजरने लिहिलं. ‘मूर्ख मुली, लताजी सुद्धा इंदूरच्या आहेत आणि तू पण. काही तर लाज ठेव,’अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली. ‘अंकिता, तुला माहितीये का, लताजी आपल्यात नाहीत,’ अशा शब्दांत एका युजरने तिला तिची चूक लक्षात आणून दिली.
इतकं ट्रोल होऊनही अंकिताने तो व्हिडीओ डिलीट केला नाही. पण हो यानंतर लगेच लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त करणारी पोस्ट तिने शेअर केलीी. ‘शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो,’असं कॅप्शन देत तिने लतादीदींना एक फोटो शेअर केला.
.