ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:56 AM2024-01-31T10:56:07+5:302024-01-31T11:01:58+5:30

बिग बॉसनंतर मात्र अंकिताची लॉटरी लागली आहे. लवकरच ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यासोबत झळकणार आहे. 

Ankita Lokhande To Make Comeback To Bollywood With Randeep Hooda's Film Swatantrya Veer Savarkar after Bigg Boss 17's | ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे

ट्रॉफी नाही पण सिनेमा लागला हाती! 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार अंकिता लोखंडे

बहुचर्चित 'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेल्या अंकिताने 'बिग बॉस १७'च्या टॉप ५मध्ये स्थान मिळवलं होतं. पण, अंकिताला हा शो जिंकता आला नाही.  विजेत्याची ट्रॉफी मुनव्वर फारुकीकडे गेली. 'बिग बॉस'च्या ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या गेलेल्या अंकिताला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसनंतर मात्र अंकिताची लॉटरी लागली आहे. लवकरच ती बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यासोबत झळकणार आहे. 

अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर तिच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डासोबत अंकिता  'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमात झळकणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं लिहलं, 'इतिहासाच्या अध्यायात हरवलेल्या नेत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. BB17 नंतर इतक्या लवकर एका नवीन अध्याय सुरुवात करत असून हे खूप खास आहे.  झी स्टुडिओज निर्मित आनंद पंडित आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबत या प्रकल्पाचा भाग झाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. येत्या 22 मार्च 2024 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये पाहायला विसरू नका'.

अकिंताचे चाहते खूश झाले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर'  हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रामुख्याने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ‘स्वतंत्र वीर सावरकर’ यांनी केलेल्या बलिदानाची अमर गाथा दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

अंकिताच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिनं मणिकर्णिका सिनेमातूनबॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात तिनं झलकरीबाईची भूमिका साकारली होती. तर बागी 3 मध्ये तिनं रुची नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. अंकितानं पवित्र रिश्ता या मालिकेतून बरीच प्रसिद्ध मिळवली होती. याच मालिकेतील तिचा को-स्टार सुशांत सिंह राजपूतसोबतचं ती रिलेशनशीपमध्ये होती. पण, दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर अंकितानं डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं.

Web Title: Ankita Lokhande To Make Comeback To Bollywood With Randeep Hooda's Film Swatantrya Veer Savarkar after Bigg Boss 17's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.