अंकिता लोखंडेची गुपचूप पार पडली मेहंदी सेरेमनी, लवकरच अडकणार बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 18:28 IST2021-01-26T18:27:45+5:302021-01-26T18:28:32+5:30

अंकिता लोखंडेचा व्हायरल झालेल्या फोटोत तिच्या हाताला मेहंदी पहायला मिळते आहे.

Ankita Lokhande secretly passes Mehndi ceremony, soon to get engaged to boyfriend Vicky Jain | अंकिता लोखंडेची गुपचूप पार पडली मेहंदी सेरेमनी, लवकरच अडकणार बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबेडीत

अंकिता लोखंडेची गुपचूप पार पडली मेहंदी सेरेमनी, लवकरच अडकणार बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबेडीत

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. तिचा सध्या एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरेतर अंकिता आणि तिची बहिण अशिताने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे.

अंकिता लोखंडेचा व्हायरल झालेल्या फोटोत तिच्या हाताला मेहंदी पहायला मिळते आहे. तिचा हा फोटो समोर येताच काही युजर्सने अंदाज लावायला सुरूवात केले की अंकिता लोखंडेने गुपचूप मेहंदी सेरेमनी केली आहे. या फोटोत अंकिता साध्या ड्रेसमध्ये दिसते आहे. तसेच तिने टियारा घातला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते तिला विकी जैनसोबत लग्न करणार का, असा प्रश्न विचारत आहेत.


यासोबत अंकिता लोखंडचे बहिण अशिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अंकिता मेहंदी लावताना दिसते आहे आणि अशिता तिला प्रेमाने मिठी मारताना दिसते आहे. अंकिताने तिचा हा फोटो इंस्टाग्रामवर प्रश्न आणि उत्तरे सेशन दरम्यान शेअर केला होता.


अंकिता लोखंडे बऱ्याच काळापासून विकी जैनला डेट करते आहे. अशात आधीच त्या दोघांच्या लग्नाचे वृत्त समोर येत आहे. अशात अंकिताने विकी जैनच्या नावाची मेहंदी लावताना तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.


नुकतेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जयंतीला अंकिता लोखंडेने त्याच्या आठवणींना उजाळा देत त्याचे काही जुने व्हिडीओ शेअर केले होते.

Web Title: Ankita Lokhande secretly passes Mehndi ceremony, soon to get engaged to boyfriend Vicky Jain