अंकिता लोखंडेने नाकारला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'? चक्क करण जोहरची ऑफर केली रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:57 AM2024-05-02T10:57:41+5:302024-05-02T10:58:41+5:30

यापूर्वी अंकिताने दिलाय संजय लीला भन्साळींच्याही सिनेमाला नकार

Ankita Lokhande rejected Student of the Year 3 ? Karan Johar s hit movie sequel | अंकिता लोखंडेने नाकारला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'? चक्क करण जोहरची ऑफर केली रिजेक्ट

अंकिता लोखंडेने नाकारला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'? चक्क करण जोहरची ऑफर केली रिजेक्ट

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) लोकप्रियतेत बिग बॉसमुळे आणखी वाढ झाली आहे. 'पवित्र रिश्ता' मालिका गाजवल्यानंतर अंकिता फारशी कुठे दिसली नाही. मणिकर्णिका सिनेमात तिने छोटी भूमिका साकारली होती. मात्र बिग बॉसमुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अंकिताने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा केला. तर आता अंकिताने करण जोहरच्या (Karan Johar)  'स्टुडंट ऑफ द इयर 3' (Student Of The Year 3) सिनेमाला नकार दिल्याचं समोर आलं आहे.

करण जोहरने 2012 साली 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून वरुण धवन, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्राला लाँच केले होते. नंतर २०१९ मध्ये त्याने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अनन्या पांडे आणि तारा सुतारियाला लाँच केले. न्यूज 18 शोशाच्या रिपोर्टनुसार, 'स्टुडंट ऑफ द इयर 3' साठी करणने अंकिता लोखंडेला ऑफर दिली. तिला नेमकी कोणत्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र अंकिताने सिनेमा नाकारला असल्याचं समोर आलं आहे. अंकिताचं भूमिका नाकारण्यामागे नेमकं काय कारण होतं हे अद्याप समजलेलं नाही.

'स्टुडंट ऑफ द इयर 3' हा सिनेमा नाही तर वेबसीरिज असणार आहे. यामधून करण जोहर इब्राहिम अली खान आणि शनाया कपूरला लाँच करण्याचा प्लॅन करत आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अंकिता लोखंडेने मात्र भूमिकेला थेट नकार दिल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. 

अंकिताने एखादा बिर ब्रेक नाकारणं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' मध्येही अंकिताला काशीचा ऑफर झाला होता. मात्र वैयक्तिक कारणांमुळे तिने ऑफर नाकारली होती. 

Web Title: Ankita Lokhande rejected Student of the Year 3 ? Karan Johar s hit movie sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.