सुशांतशी लग्न करण्याच्या नादात अंकिताने नाकारला 'बाजीराव मस्तानी', संजय लीला भन्साळी म्हणाले- पश्चाताप होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:21 IST2024-04-10T15:20:52+5:302024-04-10T15:21:38+5:30

संजय लीला भन्साळी यांनी अंकिताला दिली होती 'बाजीराव मस्तानी'ची ऑफर, सुशांतमुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

ankita lokhande rejected sanjay leela bhansali bajirao mastani movie because she wanted to marry sushant singh rajput | सुशांतशी लग्न करण्याच्या नादात अंकिताने नाकारला 'बाजीराव मस्तानी', संजय लीला भन्साळी म्हणाले- पश्चाताप होईल...

सुशांतशी लग्न करण्याच्या नादात अंकिताने नाकारला 'बाजीराव मस्तानी', संजय लीला भन्साळी म्हणाले- पश्चाताप होईल...

'पवित्रा रिश्ता' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. सध्या अंकिता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. पवित्रा रिश्तानंतर अंकिता कंगना रणौतच्या मणिकर्णिका सिनेमात दिसली होती. याबरोबरच तिला अनेक मोठ्या सिनेमांच्या ऑफरही होत्या. पण, अंकिताने सुशांत सिंह राजपूतमुळे या सिनेमांना नकार दिला. अंकिताने स्वत:च एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. 

अंकिता तिच्या कामाबरोबरच सुशांत सिंह राजपूतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होती. अंकिताला सुशांतशी लग्न करायचं होतं आणि म्हणूनच तिने बिग बजेट सिनेमांना नकार दिला होता. यामध्ये संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' अशा सिनेमांचा समावेश होता. तेव्हा अंकिता सुशांतबरोबर सिरियस रिलेशनशिपमध्ये होती आणि त्याच्याशी लग्नाची स्वप्न रंगवत होती. तेव्हा तिला करिअरपेक्षा जास्त तिचं वैयक्तिक आयुष्य आणि रिलेशनशिपला जास्त महत्त्व देणं गरजेचं वाटत होतं. 


 
'पवित्रा रिश्ता'मुळे संजय लीला भन्साळी यांनी अंकिताला 'बाजीराव मस्तानी' सिनेमाची ऑफर दिली होती. पण, तेव्हा या सिनेमात काम करण्यास अंकिताने नकार दिला होता. लग्न करायचं असल्यामुळे मला हा सिनेमा करता येणार नाही, असं अंकिताने संजय लीला भन्साळी यांना सांगितलं होतं. तेव्हा संजय लीला भन्साळी अंकिताला म्हणाले होते की 'बाजीराव मस्तानी'सारख्या सिनेमात काम करण्यास नकार दिल्याचा तुला पश्चाताप होईल. याबाबत एका मुलाखतीत अंकिता म्हणाली होती, "मला माझ्या कुठल्याच निर्णयाचा पश्चाताप नाही. मी आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले असतील. पण, मला त्याचा पश्चाताप नाही. तेव्हा माझी प्रायोरिटी वेगळी होती आणि त्यामुळेच मी चुकीचा निर्णय घेतला. हे सगळ्यांबरोबरच घडतं आणि कदाचित त्या गोष्टी माझ्या नशीबात नसतील." 

आता अंकिता संजय सिंह यांच्या 'आम्रपाली' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत अंकिताने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींच्या सिनेमाबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, "मी स्वत:ला खूप नशीबवान समजते की मी या सिनेमांसाठी ऑडिशन दिली आहे. संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर भविष्यात काम करेन, अशी आशा आहे."

Web Title: ankita lokhande rejected sanjay leela bhansali bajirao mastani movie because she wanted to marry sushant singh rajput