सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे अंकिता लोखंडे, म्हणाली- "त्याची बहीण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 18:05 IST2024-04-20T18:05:01+5:302024-04-20T18:05:29+5:30

सुशांतच्या मृत्यूनंतरही अंकिता त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला. त्याबरोबरच सुशांतला न्याय मिळेल असंही अंकिता म्हणाली. 

Ankita Lokhande is connected with Sushant sing rajput family after his death said justice milega | सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे अंकिता लोखंडे, म्हणाली- "त्याची बहीण..."

सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे अंकिता लोखंडे, म्हणाली- "त्याची बहीण..."

दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणाऱ्या सुशांत सिंह राजपूतची अचानक झालेली एक्झिट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारी होती. सुशांत आणि अंकिता लोखंडेचं प्रेमप्रकरणही प्रचंड गाजलं. अंकिता बिग बॉसच्या घरातही अनेकदा सुशांतबद्दल बोलताना दिसली. सुशांतच्या मृत्यूनंतरही अंकिता त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला. त्याबरोबरच सुशांतला न्याय मिळेल असंही अंकिता म्हणाली. 

"श्वेता दीदी आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना खूप गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्या सगळ्यांच्या मी आजही संपर्कात आहे. ते मोठ्या दु:खातून जात आहेत. आणि ही गोष्ट इतक्या सहजरितीने सोडून देणंही शक्य नाही. त्यामुळे ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत," असं अंकिता म्हणाली.  मला विश्वास आहे की नक्की न्याय मिळेल असंही तिने पुढे सांगतिलं. 

अंकिता आणि सुशांत ही टीव्हीवरील लोकप्रिय जोडी होती. एकता कपूरच्या पवित्र रिश्ता मालिकेत ते झळकले होते. या मालिकेत त्यांनी अर्चना आणि मानव या भूमिका साकारल्या होत्या. मालिकेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण, नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. 'पवित्रा रिश्ता'नंतर अंकिता अनेक सिनेमांमध्ये झळकली. 'बिग बॉस १७'मध्येही ती सहभागी झाली होती.  अलिकडेच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तर आता ती आम्रपाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Ankita Lokhande is connected with Sushant sing rajput family after his death said justice milega