वादा रहा...म्हणत रोमॅन्टिक झाली अंकिता लोखंडे, शेअर केला बॉयफ्रेन्डसोबतचा सुंदर फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:25 IST2021-10-12T14:24:37+5:302021-10-12T14:25:03+5:30

Ankita Lokhande : अंकिता विकी जैनच्या  प्रेमात आकंठ बुडालीये आणि हे प्रेम व्यक्त करायला ती जराही घाबरत नाही. कपलचे रोमॅन्टिक फोटो म्हणूनच चर्चेत असतात.

ankita lokhande expressed her love by posting a romantic photo with vicky jain | वादा रहा...म्हणत रोमॅन्टिक झाली अंकिता लोखंडे, शेअर केला बॉयफ्रेन्डसोबतचा सुंदर फोटो 

वादा रहा...म्हणत रोमॅन्टिक झाली अंकिता लोखंडे, शेअर केला बॉयफ्रेन्डसोबतचा सुंदर फोटो 

ठळक मुद्देविकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.  

‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande)अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. सध्या ती  तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन (Vicky Jain) या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे. अंकिता विकी जैनच्या  प्रेमात आकंठ बुडालीये आणि हे प्रेम व्यक्त करायला ती जराही घाबरत नाही. कपलचे रोमॅन्टिक फोटो म्हणूनच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अंकिताने विकीसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या लक्ष वेधून घेतंय.

‘ये वादा रहा,’असं कॅप्शन देत अंकिताने हा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून दोघांच्या नात्याची कल्पना यावी. दोघांनीही एकमेकांना आयुष्यभर सोबत करण्याचं वचन दिलं आहे, हे यावरून दिसतं.
कधीकाळी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात होती. त्याच्या ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकीने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.  

विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.  सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता व विकी एकमेकांच्या जवळ आलेत. दोघांच्याही मित्रांना या रिलेशनशिपबद्दल ठाऊक होते.
 अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे. 

Web Title: ankita lokhande expressed her love by posting a romantic photo with vicky jain