​अंकिताने कुणासाठी ठेवले ‘करवाचौथ’चे व्रत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 15:57 IST2016-10-20T15:57:41+5:302016-10-20T15:57:41+5:30

सुशांत अंकिताला विसरला,असे म्हणता येईल. पण अंकितासाठी सुशांतला विसरणे कदाचित इतके सोपे नाही. काल अंकिताने करवा चौथचे व्रत साजरे केले, त्यावरून तरी असेच वाटते.

Ankhe fasted for 'karva chauth' fast | ​अंकिताने कुणासाठी ठेवले ‘करवाचौथ’चे व्रत?

​अंकिताने कुणासाठी ठेवले ‘करवाचौथ’चे व्रत?

वर्षांत बॉलिवूडमधील एक ब्रेकअप सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेले. हे ब्रेकअप होते, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे. सहा वर्षांच्या सुंदर आणि स्थिर रिलेशनशिपनंतर दोघांमध्ये अचानक काहीतरी बिनसले आणि दोघेही परस्परांपासून वेगळे झालेत. ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर भेटलेले हे लव्हबर्ड्स कधीकाळी वेगवेगळ्या वाटांना जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण तसे झाले. अंकिताचा चिडका, संशयी स्वभाव आणि तिचे वाढते दारूचे व्यसन यामुळे सुशांतने तिला सोडल्याची चर्चा यानंतर रंगली. पण असे काहीही नसल्याचे खुद्द सुशांतनेच स्पष्ट केले. यानंतर सुशांत व क्रिती सेनॉन यांच्या अफेअरच्या बातम्याही रंगल्या. या बातम्यांवरून तरी सुशांत अंकिताला विसरला,असे म्हणता येईल. पण अंकितासाठी सुशांतला विसरणे कदाचित इतके सोपे नाही. काल अंकिताने करवा चौथचे व्रत साजरे केले, त्यावरून तरी असेच वाटते. खरे तर करवा चौथचे व्रत विवाहिता करतात. पण अंकिता काल या व्रतासाठी सजलेली दिसली. होय, शृंगारानंतरचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. आता अंकिताने करवा चौथचे व्रत कुणासाठी ठेवले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरे सांगायचे तर अंकिताच्या मनातले आम्ही सांगू शकत नाही. पण अंकिताने सोशल मीडियावर लिहिलेल्या मॅसेजनुसार तरी, तिने हा सगळा साज- शृंगार तिच्या विवाहित महिला चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी केला. आता खरे काय, ते अंकिताच जाणो!





 
 

Web Title: Ankhe fasted for 'karva chauth' fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.