संजय दत्त आणि सलमान खानमधली दुश्मनी अजून संपलेली नाही. हा घ्या पुरावा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 16:59 IST2017-09-20T11:27:55+5:302017-09-20T16:59:08+5:30
सलमान खान आणि संजय दत्त यांनी मुकेश अंबानी यांच्या घरी झालेल्या पार्टीत एकमेंकाना मिठी मारुन अनेकांना आश्चर्यचकित केले होते. ...

संजय दत्त आणि सलमान खानमधली दुश्मनी अजून संपलेली नाही. हा घ्या पुरावा !
स मान खान आणि संजय दत्त यांनी मुकेश अंबानी यांच्या घरी झालेल्या पार्टीत एकमेंकाना मिठी मारुन अनेकांना आश्चर्यचकित केले होते. मीडियाच्या रिपोर्टनुसार सध्या दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे. मात्र दोघांनी एकमेंकाना अलिंगन देत अनेकांना धक्का दिला होता. मिड-डेमध्ये आलेल्या वृत्तनुसार दोघांमधले वाद अजून संपले नाही अजून संजू आणि सल्लू मियाँ एकमेकांचे पूर्णपणे मित्र झालेले नाहीत. लवकरच संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. भूमी या आगामी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात येणार आहे. ज्याचे स्क्रिनिंगसाठी अनेकांच्या नावांची यादी बनवण्यात आली आहे. मात्र यात बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचे नाव सामिल नाही आहे.
मिड-डे मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार संजय आणि त्याची पत्नी मान्यता चित्रपट भूमीचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्याचे प्लॉनिंग करतायेत. यात आमिर खान, शाहरुख खान, विधु विनोद चोप्रा, रणबीर कपूर, सुनील शेट्टी, करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, अजय देवगण, काजोल यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र या स्क्रिनिंगसाठी सलमान खानला आमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. मग याचा अर्थ संजय दत्त अजूनही सलमान खानवर नाराज आहे ?
ALSO READ : ‘स्टारडम’ची आस बाळगणा-या नव्या पिढीला संजय दत्तने सांगितला नवा ‘फंडा’!
बॉलिवूड लाईफला दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान संजय म्हणाला होता, ''सलमान आपल्या कामात बिझी असतो आणि मी माझ्या कामात बिझी आहे. त्यामुळे आम्ही दोघे रोज एकमेकांना भेटू शकत नाही. मात्र सलमान मला माझ्या लहान भावासारखा आहे.'' या दोघांमधल्या वादाची ठणगी तेव्हा पडली होती जेव्हा संजय दत्त जेलमधून बाहेर आल्यानंतर बॉलिवूडमधल्या सगळ्या कलाकारांनी जाऊन संजयची भेट घेतली होती. मात्र यावेळी संजयला भेटायला सलमान खान आला नव्हता. त्यामुळे संजयची ती नाराजगी अजूनही दूर झालेली दिसत नाही.
सलमान सध्या टायगर जिंदा है च्या क्लायमैक्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासह कॅटरिना कैफ सुद्धा झळकणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. हा चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.