'ॲनिमल'मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता तृप्ती डिमरी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, "मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:08 IST2024-01-31T13:07:58+5:302024-01-31T13:08:14+5:30

'ॲनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्तीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

animal fame tripti dimri talk about marriage plans said i want good human being husband | 'ॲनिमल'मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता तृप्ती डिमरी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, "मला..."

'ॲनिमल'मधून प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता तृप्ती डिमरी लग्नबंधनात अडकणार? म्हणाली, "मला..."

२०२३च्या अखेरीस संदीप वांगा रेड्डी यांचा 'ॲनिमल' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील रणबीर कपूरच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. 'ॲनिमल'साठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन्स दिल्यामुळे तृप्ती डिमरी चर्चेत आली होती. या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्तीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

'ॲनिमल'मुळे तृप्ती डिमरीच्या चाहत्यावर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. जिकडेतिकडे तृप्तीच्या चर्चा सुरू होत्या. तृप्ती नॅशनल क्रश बनली होती. आता तृप्तीच्या लग्नाबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. तृप्तीचा एका मुलाखतीतील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. नवरा कसा हवा? याबाबतही तृप्ती या व्हिडिओत बोलत आहे. "मी अजून लग्नाचा विचार केलेला नाही. पण, मला चांगला माणूस असलेल्या व्यक्तीशी लग्न करायला आवडेस," असं तृप्तीने म्हटलं आहे. एका इन्स्टाग्राम पेजवरुन तृप्तीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

दरम्यान, 'ॲनिमल'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्तीचं नाव अनुष्का शर्माचा भाऊ कार्नेश शर्माबरोबर जोडलं गेलं होतं. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. पण, त्यानंतर त्यांनी ब्रेकअप केल्याचंही समोर आलं होतं. आता तृप्ती व्यावसायिक सॅम मर्चंटला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, याबाबत अद्याप तृप्तीने भाष्य केलेलं नाही. 

Web Title: animal fame tripti dimri talk about marriage plans said i want good human being husband