'अ‍ॅनिमल' मधील अबरारच्या भावाने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत इतकी जास्त की थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 10:43 IST2024-04-04T10:41:49+5:302024-04-04T10:43:12+5:30

'अ‍ॅनिमल' मधील बॉबी देओलच्या भावाने नवीन गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत वाचून थक्क व्हाल

animal actor saurabh sachdeva buy bmw 5 luxury car price rs 65 lakh and above | 'अ‍ॅनिमल' मधील अबरारच्या भावाने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत इतकी जास्त की थक्क व्हाल

'अ‍ॅनिमल' मधील अबरारच्या भावाने खरेदी केली आलिशान गाडी, किंमत इतकी जास्त की थक्क व्हाल

'अ‍ॅनिमल' सिनेमा चांगलाच गाजला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली. रणबीर कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, रश्मिका मंदाना अशा सर्वच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. 'अ‍ॅनिमल'मधील अशीच एक भूमिका चांगलीच गाजली ती म्हणजे बॉबी देओलच्या भावाची. सौरभ सचदेवा यांनी ही भूमिका साकारली. सौरभ सध्या चर्चेत आलेत कारण त्यांनी नुकतीच एक आलिशान लक्झरी कार खरेदी केलीय.

 सौरभ सचदेवा यांनी 'ॲनिमल'च्या यशानंतर नवीन BMW 5 सिरीजही घरी आणली आहे. या लक्झरी कारची किंमत 65.38 लाख रुपयांपासून सुरू होऊन 74.49 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन गाडी खरेदी केल्यामुळे सौरभ आणि त्यांचं कुटुंब आनंदात आहे. सौरभ यांचा गाडीच्या शोरुम मधला व्हिडीओ व्हायरल झालाय. अशाप्रकारे सौरभ यांनीही नवी गाडी घेऊन 'अ‍ॅनिमल'चं यश साजरं केलंय.

सौरभ गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. 'सेक्रेड गेम्स', 'बॉम्बे मेरी जान' अशा वेबसिरीजमधून त्यांनी अभिनय केलाय. याशिवाय खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सौरभ लोकप्रिय आहेत. 'ॲनिमल'मध्ये सौरभ यांनी साकारलेली बॉबी देओलच्या भावाची म्हणजेच अमिद हकची भूमिका लोकप्रिय झाली. या सिनेमामुळे रिअल लाईफमध्येही सौरभ आणि अमिद यांचं चांगलं बॉन्डिंग झालं.

Web Title: animal actor saurabh sachdeva buy bmw 5 luxury car price rs 65 lakh and above