अनिल कपूर यांच्या पायाला झाली गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 13:51 IST2017-04-28T08:21:22+5:302017-04-28T13:51:22+5:30

बॉलिवूडला एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जवळपास त्यांना 1 महिना आराम करावा लागणार आहे. ...

Anil Kapoor's foot hurt seriously | अनिल कपूर यांच्या पायाला झाली गंभीर दुखापत

अनिल कपूर यांच्या पायाला झाली गंभीर दुखापत

लिवूडला एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जवळपास त्यांना 1 महिना आराम करावा लागणार आहे. त्यामुळे 1 महिना ते चित्रपटाच्या शूटिंगपासून सुद्धा लांब राहणार आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. जखम एवढी खोल आहे की जर त्यांना योग्य ते उपचार मिळाले नाही तर पाय गमवण्य़ाची वेळ सुद्धा येऊ शकते. त्यामुळे त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 

मीडियाच्या रिपोर्टनुसार चित्रपटाच्या दिग्दर्शकांने ही हेच म्हटले आहे जर जखम पूर्णपणे बरी झाली नाही तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. या दुखापतीबाबत अनिल कपूर यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले हा कामाचा एक भाग आहे. सतत काम करताना तुम्हाला अशा प्रकाराच्या शारिरीक अडचणी येत असतात. मी लवकरच यावर पूर्णपणे मात करुन बरा होईन. 

'मुबारकां' या चित्रपटाच्या शूटिंगवरुन परत आल्यानंतर च्यांनी ही दुखापत झाली आहे. मुबारकां या चित्रपटाच्या माध्यमातून अनिल कपूर पहिल्यांचा पुतण्या अर्जुन कपूर बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात आथिया शेट्टी, इलियाना डिक्रूझ दिसणार आहेत. अर्जुन कपूर या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो आथिया आणि इलियाना दोघांबरोबर रोमांस करताना पाहायला मिळणार आहे. अनिल कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे काका-पुतण्याची हिट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 28 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   

Web Title: Anil Kapoor's foot hurt seriously