​ अनिल कपूर घेऊन येणार ‘रेड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 21:39 IST2016-06-18T16:09:37+5:302016-06-18T21:39:37+5:30

‘रेड’ हा ब्रुस विल्स, मॉर्गल फ्रिमन, मरिअम-लुईस पार्कर, जॉन माल्कोविच, हेलेन मिरेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला अमेरिकन अ‍ॅक्शन कॉमेडी ...

Anil Kapoor to take part in 'Red' | ​ अनिल कपूर घेऊन येणार ‘रेड’

​ अनिल कपूर घेऊन येणार ‘रेड’

ेड’ हा ब्रुस विल्स, मॉर्गल फ्रिमन, मरिअम-लुईस पार्कर, जॉन माल्कोविच, हेलेन मिरेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला अमेरिकन अ‍ॅक्शन कॉमेडी सिनेमा.  या अमेरिकन सिनेमाचा लवकरच हिंदी रिमेक येतोय. अनिल कपूर यांचे एकेएफसी बॅनर हा रिमेक घेऊन येणार आहे. लॉयन्सगेट हा जागतिक इंटरनॅशनल स्टुडिओ आणि एकेएफसी यांचा सोबत मिळून केलेला हा पहिला सिनेमा असेल. अनिल कपूर यांनी आज या चित्रपटाची घोषणा केली. ‘रेड’ नावाच्याच कॉमिक बुक सीरिजवर आधारित या चित्रपटात ब्रुस विल्स, मॉर्गन फ्रिमन, जॉन माल्कोविच यांनी भूमिका साकारल्या होत्या.  मल्टि स्टारर ‘रेड’च्या हिंदी रिमेकसाठी अद्याप कलाकारांची निवड झालेली नाही. आता यात कुणाची वर्णी लागते, ते लवकरच कळेल. येत्या आॅगस्टमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होत आहे,

Web Title: Anil Kapoor to take part in 'Red'