No Entry 2 मधून Out, भावासोबतच्या वादावर अनिल कपूरचं भाष्य; म्हणाले, 'बोनी कधीच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:16 AM2024-06-21T10:16:57+5:302024-06-21T10:18:11+5:30

'नो एंट्री' सिनेमाच्या सिक्वेलवरुन भावासोबत झालेल्या वादावर भाष्य केलं.

Anil Kapoor response on arguement with Boney Kapoor over No Entry 2 | No Entry 2 मधून Out, भावासोबतच्या वादावर अनिल कपूरचं भाष्य; म्हणाले, 'बोनी कधीच...'

No Entry 2 मधून Out, भावासोबतच्या वादावर अनिल कपूरचं भाष्य; म्हणाले, 'बोनी कधीच...'

अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहे. 'बिग बॉस ओटीटी 3' च्या होस्टिंगची जबाबदारी सलमान खान नाही तर अनिल कपूर सांभाळणार आहे. बिग बॉस ओटीटीच्या नव्या सीझनचा नुकताच फर्स्ट लूक समोर आला. अनिल कपूरचा धाँसू अवतार यामध्ये बघायला मिळणार आहे. याच सीझनच्या प्रमोशननिमित्ताने अनिल कपूरने माध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्याने 'नो एंट्री' सिनेमाच्या सिक्वेलवरुन भावासोबत झालेल्या वादावरही भाष्य केलं.

काही दिवसांपूर्वीच बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी एका सिनेमाच्या प्रमोशनवेळी 'नो एन्ट्री'च्या सीक्वेलवरुन भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी अनिल कपूर आपल्याशी नीट बोलत नसल्याचाही खुलासा केला होता. नो एन्ट्रीच्या सीक्वेलमध्ये अनिल कपूर यांना काम करण्याची खूप इच्छा होती मात्र मोठ्या भावाने त्यांना सिनेमात घेणार नसल्याचं सांगितलं. यावरुन दोन्ही भावांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. या चर्चांवर अनिल कपूर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "हे बघा ही आमच्या घरातली गोष्ट आहे यावर काय चर्चा करायची आणि माझा भाऊ बोनी कधीच चुकीचा नसतो."

अनिल कपूर यांनी एकाच वाक्यात उत्तर देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 'नो एन्ट्री' सिनेमा 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान यांची मुख्य भूमिका होती. आता सीक्वेलमध्ये या तिघांनाही घेण्यात आलेले नाही. त्यांच्या जागी वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर यांची भूमिका असणार आहे.  अनीस बज्मी हेच सीक्वेलचंही दिग्दर्शन करणार आहेत. डिसेंबरमध्ये सिनेमाचं शूट सुरु होईल अशी चर्चा आहे.

Web Title: Anil Kapoor response on arguement with Boney Kapoor over No Entry 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.