गुजराती भाषेत विचारला अनिल कपूरला चाहतीने प्रश्न आणि थेट त्याने दिले मराठीत उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 13:20 IST2021-01-01T13:17:33+5:302021-01-01T13:20:39+5:30

अनिल कपूरला त्याच्या एका फॅनने गुजरातीमध्ये प्रश्न विचारला त्यावर अनिलने थेट मराठी भाषेत उत्तर दिले. या त्याच्या उत्तरामुळे त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत.

anil kapoor replied gujarati fan's question in marathi | गुजराती भाषेत विचारला अनिल कपूरला चाहतीने प्रश्न आणि थेट त्याने दिले मराठीत उत्तर

गुजराती भाषेत विचारला अनिल कपूरला चाहतीने प्रश्न आणि थेट त्याने दिले मराठीत उत्तर

ठळक मुद्देआदिती रावल या युट्युबरने AK vs AK या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. अनिलने खूप चांगला अभिनय केला असल्याचे देखील त्याने म्हटले. या व्हिडिओत तिने अनिल कपूरला भेटून त्याची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली.

अनिल कपूरने गेल्या काही वर्षांत एकाहून एक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. AK vs AK हा अनिलचा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने सोशल नेटवर्किंगद्वारे त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. #AkVsAk हा हॅशटॅग वापरून त्याने चाहत्यांना प्रश्न विचारा असं आवाहन केले होते आणि या प्रश्नांवर त्याच्या चाहत्यांना त्याने मनमोकळेपणाने उत्तरं दिली. याच गप्पांच्या दरम्यान त्याने दिलेल्या एका उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अनिल कपूरला त्याच्या एका फॅनने गुजरातीमध्ये प्रश्न विचारला त्यावर अनिलने थेट मराठी भाषेत उत्तर दिले. या त्याच्या उत्तरामुळे त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. आदिती रावल या युट्युबरने AK vs AK या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. अनिलने खूप चांगला अभिनय केला असल्याचे देखील त्याने म्हटले. या व्हिडिओत तिने अनिल कपूरला भेटून त्याची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. तिने तिची ही इच्छा गुजरातीमध्ये सांगितली होती. त्यावर मुंबईकर असलेल्या अनिलने थेट मराठीत उत्तर देत सगळ्यांची मनं जिंकली. अनिलने उत्तर दिले की, तुम्ही मला बोलवा मी कधीही येईन...

अनिलने हे उत्तर दिल्यावर आदितीने मला मराठी कळत नसल्याचे उत्तर दिले. त्यावर आदिती ही गुजराती असल्याने तिला मराठी येत नाही. पण अनिल मुंबईकर असल्याने त्याने मराठीतच उत्तर दिले असे म्हणत नेटिझन्सनी अनिलचे कौतुक केले.   

अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या AK vs AK या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं आहे आणि २४ डिसेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

Web Title: anil kapoor replied gujarati fan's question in marathi