अँजेला क्रिंस्लिंस्की बोलली खोटी!! काल हृतिकला म्हटले मेंटर ; आज मागितली माफी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 10:00 IST2017-04-05T04:27:50+5:302017-04-05T10:00:00+5:30
हृतिक रोशनची फीमेल फॅन फॉलोर्इंग खूप मोठी आहे. पण हृतिकची मोठी चाहती असल्याचे जगाला ओरडून ओरडून सांगणा-या अँजेला क्रिंस्लिंस्कीने ...

अँजेला क्रिंस्लिंस्की बोलली खोटी!! काल हृतिकला म्हटले मेंटर ; आज मागितली माफी!
ह तिक रोशनची फीमेल फॅन फॉलोर्इंग खूप मोठी आहे. पण हृतिकची मोठी चाहती असल्याचे जगाला ओरडून ओरडून सांगणा-या अँजेला क्रिंस्लिंस्कीने हृतिकच्या डोक्याला चांगलाच ताप आणला. हृतिक माझा मेंटर असल्याचे काल अँजेलाने म्हटले होते. मी त्याच्यासोबत दोन जाहिराती केल्या. यानंतर हृतिक माझा चांगला मित्र बनला. केवळ मित्रच नाही तर माझा मेंटरही बनला. चित्रपटांची निवड करण्यापासून अॅक्टिंग टीप्स देण्यापर्यंत अशी सगळी मदत तो मला करतोय. मला त्याच्या चित्रपटात घेण्याचाही तो विचार करतोय, असे काय काय अँजेलाने एका मुलाखतीत सांगितले. अँजेला बाईंची ही मुलाखत काल मीडियात गाजली. पण हृतिक मात्र अँजेलाच्या या मुलाखतीने गोंधळून गेला. मग काय,डिअर लेडी तू कोण आहेस आणि माझे नाव घेत खोटे का बोलते आहेस? असे हृतिकने बेधडक अँजेलाला विचारून टाकले.
![]()
ALSO READ : बार्बरानंतर हृतिक रोशन बनला अँजेला क्रिंस्लिंस्कीचा मेंटर!!
हृतिकच्या या प्रश्नाचा व्हायचा तो परिणाम झालाच आणि अँजेला बाई एकदम खाडकन जाग्या झाल्या. मग काय, हृतिकला माफी मागण्याशिवाय तिच्याकडे कुठला पर्यायच उरला नाही. यानंतर अँजेलाने हृतिकची माफी मागणारा भलामोठा माफीनामा सोशल मीडियावर पोस्ट केला. मी तुझा मनापासून आदर करते आणि अशा हेडलाईनसाठी तुझी माफी मागते. मी तुझ्या कोट्यवधी चाहत्यांपैकी एक आहे. तुझ्या दोन जाहिरातींमध्ये मी काम केले आहे. मी तुला मेंटर म्हटले, याचा अर्थ मला प्रेरणा देणारा, मला योग्य मार्ग दाखवणारा असा होता. माझ्या मुलाखतीनंतर मला लाजीरवाणे वाटू लागले आहे, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले.

आता इतका मोठा माफीनामा वाचल्यानंतर हृतिक बिचारा काय करणार? त्याने अँजेलाला मोठ्या मनाने माफ केले. अँजेला एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. अँजेला लवकरच ‘रोग’ या सिनेमात दिसणार आहे.pic.twitter.com/hV6FHr805f— Angela Krislinzki (@angelakrislinzk) 4 April 2017