- आणि ट्विंकल खन्ना रणवीरच्या अंडरवियरवर घसरली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 15:27 IST2016-12-13T15:26:18+5:302016-12-13T15:27:55+5:30
अभिनेत्रीची लेखिका झालेली ट्विंकल खन्ना तिच्या परखड विचारांसाठी ओळखली जाते. मुद्दा कुठलाही असो, त्यावर स्वत:चे परखड विचार मांडताना ती जराही ...
.jpg)
- आणि ट्विंकल खन्ना रणवीरच्या अंडरवियरवर घसरली!!
अभिनेत्रीची लेखिका झालेली ट्विंकल खन्ना तिच्या परखड विचारांसाठी ओळखली जाते. मुद्दा कुठलाही असो, त्यावर स्वत:चे परखड विचार मांडताना ती जराही कचरत नाही. आता ट्विंकलने सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. होय, सुप्रीम कोर्टाने अलीकडे चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक केले. ट्विंकलने सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ही टीका करताना ट्विंकल रणवीर सिंहच्या अंडरविअरपर्यंत घसरली आणि याची बातमी झाली.
रोमॅन्टिक आणि बोल्ड चित्रपट पाहण्यापूर्वी मन देशप्रेमाने ओथंबून यावे, अशी बळजबरी का? असा सवाल आपल्या एका कॉलममध्ये ट्विंकलने केला आहे. ती या कॉलममध्ये लिहिते, ‘ राष्ट्रगीत ऐकून ज्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात, अशा लोकांपैकी मी एक आहे. राष्ट्रगीत गायची संधी मिळताच मी गळा फाडून गायला लागते.मला आजही आठवते, वाघा बॉर्डरवर गेले होते, तेव्हा मी अगदी बेंबीच्या देठापासून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी पाकिस्तानच्या बाजूनेही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा होत होत्या. आता देशप्रेम मोजण्याचे कुठलेही निकष तर नाहीत. म्हणूनच अनेकदा आवाजावरून आपण देशप्रेम मोजतो. ज्याचा आवाज मोठा, तो विजयी, असे आपण मानतो. पण एक विचार करून माझे डोके अद्यापही गरगरते आहे. मी ‘बेफिक्रे’चे तिकिट खरेदी केलेय आणि काही वेळानंतर लाल रंगाच्या अंडरविअरमध्ये रणवीर सिंह मला पडद्यावर दिसणार असेल तर मी स्वत: कसे आणि का देशप्रेमी समजावे? ’
ट्विंकल ने पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावरही टीका केली आहे. आपल्या एका मैत्रिणीला यानिमित्ताने तिने एक विचित्र सल्ला दिला आहे. ‘डिमॉनेटाइजेशन नाम की कड़वी गोली खा लो, एविडेंस (सबूत) छुपाने के लिए कैश आॅन डिलीवरी प्रोसेस भूल जाओ और अपने क्रेडिट कार्ड से एक वाइब्रेटर खरीद लो’ असे तिने लिहिले आहे.