बहिणीमुळे एका मोठ्या अडचणीत सापडली होती अनन्या पांडे, सावरता सावरता नाकात आला होता दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 14:00 IST2021-03-20T14:00:32+5:302021-03-20T14:00:58+5:30

बहिणीची एक चूक अनन्या पांडेच्या अंगाशी आली होती.

Ananya Pandey was in big trouble because of her sister | बहिणीमुळे एका मोठ्या अडचणीत सापडली होती अनन्या पांडे, सावरता सावरता नाकात आला होता दम

बहिणीमुळे एका मोठ्या अडचणीत सापडली होती अनन्या पांडे, सावरता सावरता नाकात आला होता दम

अभिनेत्री अनन्या पांडे हिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अनन्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. हल्लीच अनन्याची चुलत बहिण अलाना पांडे भारतात आली होती. या दरम्यान अनन्या आणि तिची बहीण रायसा यांच्यासोबत अलाना पांडे भारतात व्लॉग शूट केला असून, यात रायसाने एक मोठा खुलासा केला आहे. रायसाच्या या कृत्यामुळे अनन्या एका मोठ्या अडचणीत सापडली होती.


अभिनेता चंकी पांडे यांच्या घरी या तिन्ही बहिणी जमल्या होत्या. व्हिडिओमध्ये रायसाने सांगितले की, तिने एकदा अनन्याचा फोन नंबर इंटरनेटवर शेअर केला होता. रायसाला भविष्यात चित्रपट निर्माता व्हायचे आहे आणि यूट्यूबवर ती असे व्लॉग आणि लघुपट अपलोड करत असते. एकदा रायसाने अशीच एक शॉर्टफिल्म सोशल मीडियावर शेअर केली होती. अनन्याचे काही वैयक्तिक तपशीलही त्यात दिसत असल्याचे, तेव्हा तिच्या लक्षातच आले नाहीत. मात्र, स्वतःची चूक समजल्यावर रायसा म्हणाली, ‘मी दीदीचा नंबर लीक केला आहे’.


यावर अनन्याने सांगितले की, माझा मोबाईल नंबर चित्रपटाच्या एका भागात दिसत होता आणि लोकांना हे कसे कळले ते, मला समजले नव्हते. दरम्यान मला भरपूर कॉल येऊ लागले. त्यानंतर रायसाने तो व्हिडीओ हटवला आणि पुन्हा एकदा अपलोड केला.


अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास 'स्टूडेंट ऑफ द ईयर-2′ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनन्या प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटाला 'बेस्ट डेब्यू' फिल्मफेयर अवॉर्डदेखील मिळाला होता. याशिवाय 'पति, पत्नी और वो' आणि 'खाली पीली'मध्येही ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. दोन्ही सिनेमातील तिच्या भूमिका पसंत केल्या गेल्या.

अनन्या लवकरच ‘लायगर’ चित्रपटात विजय देवरकोंडा सोबत दिसणार आहे. अनन्या आणि विजय देवरकोंडा या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनन्या आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. ती शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसह स्क्रीन शेअर करणार आहे. 

Web Title: Ananya Pandey was in big trouble because of her sister