अनन्या पांडेचं Dream Home! धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर केला गृहप्रवेश, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 18:08 IST2023-11-10T18:01:08+5:302023-11-10T18:08:00+5:30
धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर अनन्याने स्वत:चं नवं घर खरेदी केलं आहे.

अनन्या पांडेचं Dream Home! धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर केला गृहप्रवेश, म्हणाली...
स्टारकिड अनन्या पांडे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुप्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची अनन्या मुलगी आहे. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या अनन्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक चित्रपटांत ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. बॉलिवूडमधील करिअरबरोबर अनन्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अनन्याने वैयक्तिक आयुष्यात एक पाऊल पुढे ठेवलं आहे. धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर अनन्याने स्वत:चं नवं घर खरेदी केलं आहे.
अनन्याने सोशल मीडियावरुन तिच्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत. पारंपरिक पद्धतीने पूजा करत नारळ फोडून अनन्याने घरात गृहप्रवेश केला आहे. "माझं नवीन घर!!! तुमच्या प्रेमाची आणि सकारात्मक ऊर्जेची गरज आहे. नवीन सुरुवात...हॅपी धनतेरस", असं कॅप्शन अनन्याने या फोटोंना दिलं आहे. अनन्याच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने 'लायगर', 'ड्रीम गर्ल २', 'पती पत्नी और वो', 'खाली पिली' यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. अनन्याचा चाहता वर्गही मोठा आहे.