चंकी पांडेची मुलगी अनन्याला विसरा तिची चुलत बहिण अलाना पांडेचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्रेझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 12:41 IST2019-08-20T12:38:30+5:302019-08-20T12:41:27+5:30
बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बासू हिची मैत्रीण आणि फिटनेस तज्ञ डियाना पांडे हिची अलाना ही लेक आहे.

चंकी पांडेची मुलगी अनन्याला विसरा तिची चुलत बहिण अलाना पांडेचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल क्रेझी
बॉलीवूडमध्ये आणखी एका स्टार किडची लवकरच एंट्री होत आहे. बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे. ही अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे याची पुतणी अलाना पांडे. 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दणक्यात एंट्री करणारी अभिनेत्री अनन्या पांडे हिची अलाना ही चुलत बहीण आहे.
बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बासू हिची मैत्रीण आणि फिटनेस तज्ञ डियाना पांडे हिची अलाना ही लेक आहे. अलाना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिथे आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत अलाना चर्चेत असते. नुकतंच बॉयफ्रेंड यूडी जयसिंहसोबत अलाना मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती.
तिथलेच काही हॉट आणि बोल्ड फोटो अलानाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलाना आणि यूडी गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत असलेली अलाना लवकरच रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार असल्याचे बोललं जात आहे. अलानाच्या हॉट आणि सेक्सी फोटोंवर फॅन्स आणि नेटकऱ्यांकडून कमेंट्स तसंच लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. याशिवाय स्वतःचे सेक्सी व्हिडिओ शेअर करून अलाना सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.