मावशी झाली अनन्या पांडे! बहिणीला पुत्ररत्न, व्हिडिओतून दाखवली गोंडस बाळाची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 12:37 IST2024-07-08T12:37:12+5:302024-07-08T12:37:49+5:30

अनन्या पांडे मावशी झाली आहे. अनन्याची बहीण अलाना पांडे हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

ananya panday cousin sister alana panday gave birth to baby boy shared new born video | मावशी झाली अनन्या पांडे! बहिणीला पुत्ररत्न, व्हिडिओतून दाखवली गोंडस बाळाची झलक

मावशी झाली अनन्या पांडे! बहिणीला पुत्ररत्न, व्हिडिओतून दाखवली गोंडस बाळाची झलक

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अनन्याच्या घरातून गुडन्यूज आली आहे. अभिनेत्रीवर एक मोठी जबाबदारी पडली आहे. अनन्या पांडे मावशी झाली आहे. अनन्याची बहीण अलाना पांडे हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अलानाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. 

काही महिन्यांपूर्वीच अलाना आणि तिचा पती आयव्होर मॅकक्रेने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. अलानाच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अलानाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मुलगा झाल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये अलानाने तिच्या गोंडस बाळाची झलकही दाखवली आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्यानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. "माझं गोंडस बाळ...माझा भाचा", अशी कमेंट अनन्याने केली आहे. 

अलाना ही अनन्याची चुलत बहीण आहे. अलाना ही चंकी पांडे यांचे भाऊ चिक्की पांडे यांची मुलगी आहे. २०२३ मध्ये तिने बॉयफ्रेंड आयव्होर मॅकक्रेसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर आई होणार असल्याची बातमी तिने चाहत्यांना दिली होती. अलाना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तर आयव्होर फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आहे. दोघंही अमेरिकेत राहतताच. २०२१ साली आयव्होरने अलाना मालदीवमध्ये रोमँटिक अंदाजात प्रपोज केले होते. तर गेल्यावर्षी त्यांनी भारतात येत पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. 

Web Title: ananya panday cousin sister alana panday gave birth to baby boy shared new born video