Anant Radhika Pre Wedding: समुद्राच्या मध्यभागी होणार अनंत-राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशन, जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 15:40 IST2024-05-16T15:40:08+5:302024-05-16T15:40:53+5:30
अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनशी नवीन अपडेट समोर आले आहे.

Anant Radhika Pre Wedding: समुद्राच्या मध्यभागी होणार अनंत-राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशन, जाणून घ्या सविस्तर
गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचं प्री-वेडिंग फंक्शन्स धमाकेदार झालं होतं. जगभरात त्याचीच चर्चा होती. आता पुन्हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं आणखी एक प्री-वेडिंग सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं आहे. या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचं लोकेशन खूपच प्रेक्षणीय आहे. अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनशी नवीन अपडेट समोर आले आहे.
अनंत आणि राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग सेलिब्रेशन हे थेट समुद्राच्या मधोमध २८ ते ३० मे दरम्यान एका क्रूझवर होणार आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या सेलिब्रेशनसाठी ८०० पाहुण्यांना आमंत्रित केले जाईल. रिपोर्टनुसार, क्रूझ इटलीच्या बंदरातून निघेल आणि हा प्रवास दक्षिण फ्रान्समध्ये संपेल. दक्षिण फ्रान्समधील समुद्राच्या मध्यभागी क्रूझवर धमाकेदार सेलिब्रेशन होणार आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला मुलगा आणि सुनेचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन धमाकेदार बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयेत.
अनंत आणि राधिकाचे लग्न जुलैमध्ये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा RIL आणि Jio Platforms Ltd च्या संचालक म्हणून काम पाहतो. राधिका ही Encore Healthcare CEO वीरेन मर्चंट यांची सर्वात लहान मुलगी आहे. अनंत आणि राधिका हे वेळ चांगली असो किंवा वाईट जोडीदार म्हणून एकमेकांच्या कायम सोबत होते. अनंत अंबानी यांच्या जीवनात राधिका मर्चंटची साथ कायमच एक उत्तम उदाहरण ठरली आहे.