'रांझणा'नंतर आनंद एल राय आणि धनुष पुन्हा एकत्र येणार, 'तेरे इश्क में'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:15 IST2023-06-21T17:15:12+5:302023-06-21T17:15:38+5:30

Dhanush : धनुषने रांझणाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा आनंद एल राय यांच्यासोबत काम करणार आहे.

Anand L Rai and Dhanush will reunite after 'Raanjna', announces 'Tere Ishq Mein' | 'रांझणा'नंतर आनंद एल राय आणि धनुष पुन्हा एकत्र येणार, 'तेरे इश्क में'ची घोषणा

'रांझणा'नंतर आनंद एल राय आणि धनुष पुन्हा एकत्र येणार, 'तेरे इश्क में'ची घोषणा

आनंद एल राय (Anand L Rai) हे प्रेक्षकांना नेहमीच वेगळ्या धाटणीचे सिनेमे घेऊन येत असतात. त्यांच्या दिग्दर्शन प्रवासातील सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे रांझणा (Ranjhana). या चित्रपटाने नुकतेच १० वर्षे पूर्ण केली असून आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या सुपरहिट चित्रपटाची १० वर्ष पूर्ण करत असताना आनंद एल राय त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. 'तेरे इश्क में' (Tere Ishq Mai) हा नवाकोरा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटात अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद एल राय आणि धनुष ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम करणार आहेत आणि यातून नक्कीच काहीतरी अफलातून कलाकृती घडणार आहे यात शंका नाही. 

याबद्दल दिग्दर्शक आनंद एल राय म्हणाले की, धनुषसोबत 'तेरे इश्क में' या आमच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आज सारखा खास दिवस आला आहे. हा एक अनोखा योगायोग आहे. 'रांझणा' हा एक चित्रपट नसून ती एक भावना आहे. माझ्या हृदयात या चित्रपटासाठी  विशेष प्रेम आहे. जगभरातील चाहत्यांकडून या चित्रपटासाठी मिळणारे प्रेम नक्कीच हृदयस्पर्शी आहे.

धनुषने 'रांझणा'तून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण
धनुषने रांझणाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. त्याच्या अफाट प्रतिभेने त्याला दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपट उद्योगांमध्ये मोठा चाहतावर्ग मिळवून दिला आहे. हिंदी आणि दक्षिण सिनेइंडस्ट्रीत धनुषची कलाकार म्हणून असलेली क्षमता ओळखण्यात आनंद एल राय यशस्वी ठरले.

 


आनंद एल राय यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय चित्रपट केले आहेत. ज्यात तनु वेड्स मनू,अतरंगी रे, गुडलक जेरी, अ‍ॅक्शन हिरो,हॅपी भाग जायगी, यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटाचा  समावेश आहे. न्यूटन, तुम्बाड अशा असंख्य चित्रपटात त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवून दिली आहे. धनुष आणि आनंद एल राय या डायनॅमिक जोडीने लेखक हिमांशू शर्मा, गीतकार इर्शाद कामिल आणि संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासमवेत २०१३ मध्ये रांझणा चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर जादू निर्माण केली आणि तब्बल १० वर्षांनी आजही हा चित्रपट एव्हरग्रीन ठरतो आहे. तब्बल १० वर्षांनी पुन्हा ' तेरे इश्क में' या नवी चित्रपटातून पुन्हा एक जादुई अनुभव अनुभवयाला मिळणार यात शंका नाही. 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Anand L Rai and Dhanush will reunite after 'Raanjna', announces 'Tere Ishq Mein'

टॅग्स :Dhanushधनुष