इरफान खानचा हा सिनेमा अखेर राहिला अपूर्ण, हा अभिनेता करणार आता पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 17:20 IST2020-05-14T17:12:36+5:302020-05-14T17:20:28+5:30

या सिनेमाचे नाव इमरजन्सी असणार आहे.

Anand gandhi to collaborate with sushant singh rajput after irrfan khan death gda | इरफान खानचा हा सिनेमा अखेर राहिला अपूर्ण, हा अभिनेता करणार आता पूर्ण

इरफान खानचा हा सिनेमा अखेर राहिला अपूर्ण, हा अभिनेता करणार आता पूर्ण

आपल्या अभिनयाच्या जोकावर रसिकांच्या मनात अधिराज्या गाजवणाऱ्या अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला आहे. आजही अनके फिल्ममेकर्सची पहिली पसंत इरफान खान होते. तुम्बाडचा दिग्दर्शक आनंद गांधींना इरफान खान यांना आपल्या सिनेमात घ्यायचे होते मात्र त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. इरफानच्या जागी आता सुशांत सिंग राजपूतला कास्ट करण्यात आले आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून इरफान यांना डोळ्यासमोर ठेवून आनंद या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते. या सिनेमाचे नाव इमरजन्सी असणार आहे. इरफान यांच्या निधनानंतर सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आला आहे. 

इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार आनंद म्हणाले, मला या सिनेमाची कथा पूर्ण करायला खूप वेळ लागला. मला इऱफान खान यांना घेऊन हा सिनेमा तयार करायचा होता मात्र आता ते आपल्यात नाहीत. अशा परिस्थिती मी माझा मित्र सुशांत सिंग राजपूतला घेऊन हा सिनेमा पूर्ण करतो आहे. सिनेमात ४ मुख्य कलाकार असतील. 

बी-टाऊनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव्ह लाईफची चर्चा आहे. दोघे सतत व्हॅकेशन, डिनर डेटवर एकत्र दिसतात. मात्र हे नाते पब्लिक होऊ नये, यासाठी सुशांत व रियाने बरेच प्रयत्न केलेत. दोघांनी या रिलेशनशीपवर कोणतेच भाष्य केले नाही.

Web Title: Anand gandhi to collaborate with sushant singh rajput after irrfan khan death gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.