या अभिनेत्रीच्याच हॉट फोटोची आहे सगळीकडेच चर्चा, सगळ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:35 IST2020-01-03T15:32:35+5:302020-01-03T15:35:02+5:30

या अभिनेत्रीने बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची ही काही पहिली वेळ नाही.

Amyra Dastur flaunts her enviable body in red bikini | या अभिनेत्रीच्याच हॉट फोटोची आहे सगळीकडेच चर्चा, सगळ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

या अभिनेत्रीच्याच हॉट फोटोची आहे सगळीकडेच चर्चा, सगळ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

ठळक मुद्देअमायराने ताज्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या हॉट अदांवर सध्या लाईक्सचा पाऊस पडतोय. तिचा बिकनीमधील हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावत आहे.

अभिनेत्री अमायरा दस्तूर काही महिन्यांपूर्वी संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण अमायराच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. अमायरा सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते. तिच्या काही ताज्या फोटोंनी तर कमाल केलीय. होय, सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या अमायराच्या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली आहे.

अमायराने ताज्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या हॉट अदांवर सध्या लाईक्सचा पाऊस पडतोय. तिचा बिकनीमधील हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावत आहे. अमायराने बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची ही काही पहिली वेळ नाही. तिने याआधी देखील अनेकवेळा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

काही महिन्यांपूर्वी अमायराने मीटू मोहिमेवर बोलताना एक खळबळजनक खुलासा केला होता. पुरूष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरल्याचा शॉकिंग खुलासा तिने केला होता. 

‘मी पुरूष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरले. पण त्यांची नावे जगजाहीर करून त्यांना जगासमोर उघडे करण्याची हिंमत माझ्यात नाही. ते इंडस्ट्रीतील शक्तीशाली व्यक्ती आहेत. मी कास्टिंग काऊचला बळी पडले नाही. पण याशिवाय बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री दोन्ही ठिकाणी मी अत्याचार सहन केला. एक दिवस मी नक्कीच याचा खुलासा करेल. पण जोपर्यंत मी स्वत:ला सुरक्षित समजत नाही, तोपर्यंत मी कुणाकडेही बोट दाखवणार नाही, असे अमायरा म्हणाली होती.

Web Title: Amyra Dastur flaunts her enviable body in red bikini