एमी जॅक्सनला करायचा आहे सिद्धार्थ मल्होत्राचा खून! कारण वाचून व्हाल हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 12:32 IST2017-02-21T07:02:38+5:302017-02-21T12:32:38+5:30

एमी जॅक्सनला सिद्धार्थ मल्होत्राचा खून करायचा आहे. वाचून आश्चर्य वाटले ना! पण सिद्धार्थ ने असे काय केले आहे की, ...

Amy Jackson wants to murder Siddharth Malhotra! Will be reading for reasons ... | एमी जॅक्सनला करायचा आहे सिद्धार्थ मल्होत्राचा खून! कारण वाचून व्हाल हैराण...

एमी जॅक्सनला करायचा आहे सिद्धार्थ मल्होत्राचा खून! कारण वाचून व्हाल हैराण...

ी जॅक्सनला सिद्धार्थ मल्होत्राचा खून करायचा आहे. वाचून आश्चर्य वाटले ना! पण सिद्धार्थ ने असे काय केले आहे की, एमीला त्याला मारावेस वाटतेय? नुकतेच एका मुलाखतीमध्ये  तिला वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा टायगर श्रॉफ यांच्यापैकी कोणाशी लग्न, कोणाशी प्रेमसंबंध आणि कोणाचा खून करायला आवडेल असे विचारण्यात आले तेव्हा तिने खून करण्यासाठी सिद्धार्थचे नाव घेतले.

असे का तर म्हणे सिद्धार्थ आॅलरेडी रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे तिला त्याला मारायचे आहे. ती म्हणाली, ‘मी टायगरशी लग्न करेल, वरुणशी प्रेमसंबंध जोडेल आणि सिद्धार्थचा खून करेल कारण तो आधीच प्रियांकाशी एंगेज झाला आहे.’ काय प्रियांका? पण तो तर आलियाला डेट करतोय ना? मग प्रियांकाशी त्याचे सूत कधी जुळले?

एखाद्या निष्कर्षापर्यंत येण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आलिया आणि सिद्धार्थचे ब्रेक-अप झाले नसून तो प्रियांकासोबत करीत असलेल्या एका जाहिरातीबद्दल एमी बोलत होती. नुकतेच प्रियांका आणि सिद्धार्थने एका जाहिरातमध्ये एकत्र काम केलेले आहे. त्याचे पोस्टर्सचा संदर्भ देत एमी म्हणाली की, त्याने प्रियांकाशी एंगेजमेंट केली असल्यामुळे मला त्याला मारायचे आहे.

ALSO READ: एमी जॅकसन म्हणते, ‘मला सलमानसोबत डेट करायला आवडेल’

आता सिद्धार्थ आणि आलिया नेहमी एकत्र दिसतात. शाहिद कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीतही हे दोघे एकाच कारमध्ये आले होते. दोघांनी अद्याप त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अधिकृत घोषणा केली नसली तरी वरुणने ‘कॉफी विथ करण’ या शोवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होतो.

करण जोहरने जेव्हा आलियाला विचारले की, तु कोणासाठी जेलमध्ये जाऊ शकते तेव्हा तिने करण आणि सिद्धार्थचे नाव घेतले होते. आता करणने तिला चित्रपटसृष्टीमध्ये तिला ब्रेक दिला म्हणून त्याचे नाव घेणे समजू शकतो पण सिद्धार्थसाठी जेलमध्ये जाण्यास ती तयार आहे  म्हटल्यावर तो तिच्यासाठी किती ‘स्पेशल’ आहे हे कळते.

ALSO READ: ​एमी जॅक्सनचा मोबाइल हॅक; लीक केले पर्सनल फोटोज्

Web Title: Amy Jackson wants to murder Siddharth Malhotra! Will be reading for reasons ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.