"चंदीगडमध्ये त्यांनी..." अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:13 IST2025-05-19T10:09:39+5:302025-05-19T10:13:19+5:30

'शेरशाह'च्या सेटवर कसं फुललं प्रेम, अमृता खानविलकरच्या नवऱ्यानं सांगितली सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी

Amruta Khanvilkar Husbund Himanshu Malhotra On Shershaah And Sid-kiara’s Love Story | "चंदीगडमध्ये त्यांनी..." अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी

"चंदीगडमध्ये त्यांनी..." अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्हस्टोरी

Himanshu Malhotra on  Sid-kiara’s Love Story: बॉलिवूडमधल्या कित्येक जोड्या या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन हीट ठरलेल्या आहेत. ज्यात सैफ आणि करीना, अजय देवगण आणि काजोल, रितेश आणि जिनिलिया, रणवीर सिंग– दीपिका यांची नाव आहेत. पण, यासोबतचं एक जोडी आहे ती म्हणजे कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra). 'शेरशहा' चित्रपटात ही जोडी आपल्याला पहिल्यांदा दिसली होती. या चित्रपटाच्या सेटवरचं दोघांमध्ये प्रेम फुललं होतं, त्यांच्या प्रेमाचा पहिला टप्पा अगदी जवळून पाहिला होता तो म्हणजे अभिनेता हिमांशू मल्होत्रानं (Himanshu Malhotra). हिमांशूनं 'शेरशहा' चित्रपटात महत्त्वाच्या भुमिकेत झळकला होता. हिमांशू मल्होत्रा हा मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar Husbund) पती आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये हिमांशूनं सिद्धार्थ व कियाराच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.

हिमांशूनं अलिकडेच 'स्क्रीन'ला मुलाखत दिली. यावेळी त्यानं 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर सिद्धार्थ व कियाराचं प्रेम कसं हळूहळू फुललं त्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "आम्हाला त्यांच्या प्रेमाबद्दल जास्त माहिती नव्हतं. पण ते फुलताना आम्हाला जाणवत होतं. पालनपूरमध्ये आम्ही त्या दोघांना एकत्र पाहिलं होतं, तिथे अंत्यसंस्काराचा सीन चित्रित झाला होता. आम्ही कियाराला फक्त तेव्हाच पाहिलं होतं. कारण त्यानंतर आम्ही शुटिंगसाठी कारगिलला गेलो होतो".

हिमांशू पुढे म्हणाला, "मला वाटतं तेव्हा ते नुकतेच प्रेमात पडले होते. आम्ही त्यांना भेटलो, फोटो काढले आणि आम्ही सर्वजण एकत्र बसलो.  मला वाटतं तिथूनच सुरुवात झाली असावी. त्यानंतर चंदीगडमध्ये त्यांनी कॉलेज लाईफचं शुटिंग केलं होतं. तिथेच त्यांच्यातील प्रेम फुललं".

'शेरशाह' हा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात सिद्धार्थनं कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती, तर कियाराने त्यांची प्रेयसी डिंपल चीमा यांचं पात्र साकारलं होतं. चित्रपटातली केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत आली होती.  'शेरशाह'च्या सेटवर प्रेमात पडल्यानंतर दोघांनी काही वर्ष एकमेंकाना डेट केलं आणि त्यानंतर दोघांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केलं होतं. आता हे कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत.

Web Title: Amruta Khanvilkar Husbund Himanshu Malhotra On Shershaah And Sid-kiara’s Love Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.