So beautiful, So elegent! नवीन वर्षात अमृता फडणवीसांचा हटके व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:45 PM2024-01-01T12:45:34+5:302024-01-01T12:46:20+5:30

Amruta fadnavis: अमृता फडणवीस यांनी 2024 चं स्वागत केलं असून त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांची लेक सुद्धा दिसून येत आहे.

amruta-fadnavis-special-new-year-2024-wishes-sings-a-viral-song | So beautiful, So elegent! नवीन वर्षात अमृता फडणवीसांचा हटके व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिलात का?

So beautiful, So elegent! नवीन वर्षात अमृता फडणवीसांचा हटके व्हिडीओ व्हायरल; तुम्ही पाहिलात का?

2023 वर्ष संपलं आणि आजपासून नव्या वर्षाला म्हणजेच 2024 ला सुरुवात झाली. जगभरात मोठ्या उत्साहात  नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. अनेक जण एकमेकांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच सेलिब्रिटी, दिग्गज नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनीही चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे या माध्यमातून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर त्यांनीही इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमधून त्यांनी चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नव्या वर्षाला आज सुरुवात झाली आहे, जगभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केले जात आहे. जगभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकर यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. अनेक सेलिब्रीटी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रसिद्ध गायीका अमृता फडणवीस यांनी देखील त्यांच्या चाहत्यांना हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी "सो ब्युटीफुल सो इलिगंट'' या गाजलेल्या डायलॉगवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांची लेकी दिविजा सुद्धा दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अमृता फडणवीस या गायिका असण्यासोबतच बँकर सुद्धा आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचं नवीन गाणं रिलीज झालं होतं. तुम्ही 'आईने की जरुरत नहीं' हे त्यांचं गाणं नेटकऱ्यांमध्ये विशेष गाजलं होतं.
 

Web Title: amruta-fadnavis-special-new-year-2024-wishes-sings-a-viral-song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.