सारा खानमुळे अमृता सिंग ‘मुबारका’ मधून बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 18:27 IST2016-12-02T18:20:12+5:302016-12-02T18:27:38+5:30

‘मुबारका’ चित्रपट सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या दुहेरी भूमिकेमुळे खुप गाजतोय. या चित्रपटात प्रथमच अर्जुन कपूर आणि अनिल कपूर ही ...

Amrita Singh out of 'Mubaraka' due to Sarah Khan? | सारा खानमुळे अमृता सिंग ‘मुबारका’ मधून बाहेर?

सारा खानमुळे अमृता सिंग ‘मुबारका’ मधून बाहेर?

ुबारका’ चित्रपट सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या दुहेरी भूमिकेमुळे खुप गाजतोय. या चित्रपटात प्रथमच अर्जुन कपूर आणि अनिल कपूर ही मामा-भाच्याची जोडी पहावयास मिळणार आहे. मात्र, सुत्रांकडून असेही कळाले होते की, ‘मुबारका’ चित्रपटातून अमृता सिंग हिला तारखांचा मेळ न जमल्याने बाहेर पडावे लागले. तिच्या जागेवर ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक हिला घेण्यात आले. असे का झाले? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण तुम्हाला माहितीये का? चित्रपट सोडण्यामागचे खरे कारण आहे सारा खान. कारण ‘मुबारका’ हा चित्रपट सारा खानचा डेब्यू चित्रपट आहे. 

                                                               

अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा खान हिचा तिची आई अमृता सिंगसोबत मध्यंतरी वाद होत होते. अनेकदा साराने तिच्या करिअरविषयी अनेक आरोप अमृतावर केले. पण, आता अमृताला साराच्या करिअरमधील अडसर व्हायचे नाहीये. ‘बी टाऊन’ मधील साराचा ‘मुबारका’ हा चित्रपट म्हणजे बिग डेब्यू चित्रपट आहे. अशी सुवर्णसंधी साराला पुन्हा मिळणार नाही. म्हणून एक आई म्हणून अमृतालाच हा चित्रपट सोडावासा वाटला. अमृताचे पुन्हा सारासोबत काही  वाद नकोत या विचाराने तिने हा चित्रपटापासून दूर होणेच पसंत केले. 

                            

अमृता सिंगचे बॉलिवूडमधील करिअर फार काही यशस्वी झाले असे नाही. पण, तिने जे काही चित्रपट साकारले त्यातील तिच्या भूमिकेचे आजही कौतुक करण्यात येते. मात्र, आता तिची मुलगी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरूवात करू पाहतेय तर तिची आई म्हणून ती साराच्या मार्गात येणार नाही याची पूर्ण कल्पना तिला आहे. रत्ना पाठक आणि सारा खान यांच्यासह अथिया शेट्टी, इलियाना डिक्रुस या देखील दिसतील. पाहूयात, या सर्व अभिनेत्री एकत्र काय धम्माल करतात ते!!

Web Title: Amrita Singh out of 'Mubaraka' due to Sarah Khan?