अमृता राव झाली बाद, आता पती आरजे अनमोल करणार टीव्ही डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 22:02 IST2018-08-22T21:59:06+5:302018-08-22T22:02:10+5:30

२०१३मध्ये अमिताभ बच्चन स्टारर ‘सत्याग्रह’ या चित्रपटात अमृता राव अखेरची दिसली. या चित्रपटानंतर ती जणू बॉलिवूडमधून गायबचं झाली. पण आता आम्ही अमृताबद्दल नाही तर तिचा पती आर जे अनमोल सूद याच्याबद्दलची खास बातमी देणार आहोत.

Amrita Rao’s husband RJ Anmol Sood to make his TV debut with Life Zara Hatke | अमृता राव झाली बाद, आता पती आरजे अनमोल करणार टीव्ही डेब्यू!!

अमृता राव झाली बाद, आता पती आरजे अनमोल करणार टीव्ही डेब्यू!!

शाहिद कपूरच्या ‘इश्क-विश्क’ या चित्रपटातील ती निष्पाप, चुलबुली हिरोईन आठवते? पुढे ती ‘विवाह’ या चित्रपटातही शाहिदसोबत दिसली. होय,आम्ही बोलतोय ते अभिनेत्री अमृता रावबद्दल. २०१६ मध्ये अमृता रावने आरजे अनमोल सूदसोबत लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी २०१३मध्ये अमिताभ बच्चन स्टारर ‘सत्याग्रह’ या चित्रपटात अमृता अखेरची दिसली होती. या चित्रपटानंतर ती जणू बॉलिवूडमधून गायबचं झाली. पण आता आम्ही अमृताबद्दल नाही तर तिचा पती आर जे अनमोल सूद याच्याबद्दलची खास बातमी देणार आहोत.

होय, अमृताचा पती अनमोल लवकरच टीव्ही डेब्यू करतोय. Epic चॅनलवरच्या ‘लाईफ जरा हटके’ या लवकरचं सुरू होणाऱ्या शोमध्ये अनमोलची वर्णी लागली आहे. अंकुर आणि दानिश या दोन स्वप्नाळू तरूणांच्या आयुष्यावर बेतलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अंकुरने स्टँड डप कॉमेडियन म्हणून आपले नवे नवे करिअर सुरु केले असते आणि दानिश याने वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे करिअर म्हणून निवडले असते. हे करिअर म्हणजे त्यांचे पॅशन असते. हे पॅशन पूर्ण करताना त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते, त्याचीच ही कथा. यात अनमोल दानिशची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

२०१६ मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. टिष्ट्वटरवर तिने लग्नाची बातमी जाहिर केली होती. लग्नापूर्वी अमृता व अनमोल ७ वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले. अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.

Web Title: Amrita Rao’s husband RJ Anmol Sood to make his TV debut with Life Zara Hatke