अमृता फडणवीसांचा बिग बीसोबत म्युझिक व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 18:55 IST2016-11-30T11:20:35+5:302016-11-30T18:55:39+5:30

एक सक्षम व्यक्तीमत्व, सुरेल आवाजाने सर्वांच्या मनात स्थान मिळवलेल्या, मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृती करण्यासाठी ' न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या ...

Amrita Fadnavis Music Video with Big B | अमृता फडणवीसांचा बिग बीसोबत म्युझिक व्हिडिओ

अमृता फडणवीसांचा बिग बीसोबत म्युझिक व्हिडिओ

सक्षम व्यक्तीमत्व, सुरेल आवाजाने सर्वांच्या मनात स्थान मिळवलेल्या, मुलींच्या शिक्षणाबद्दल जागृती करण्यासाठी ' न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची पत्नी यापेक्षा वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिसेस फडणवीस म्हणजे एक वेगळंच व्यक्तीमत्व आहेत. त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातला आणखी एक नवा पैलू समोर आला आहे.

लवकरच त्या आपल्या समोर एका ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहेत. बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

रसिकासांठी पुन्हा खुले झालेले गिरगावमधील ऐतिहासिक 'आॅपेरा हाऊस'मध्ये  ‘फिर से' या सुंदर गाण्याच्या व्हिडिओचे शूटिंग नुकतेच पार पडले. विशेष म्हणजे या गाण्याला त्यांनीच स्वरसाज चढवला आहे.

                                    

प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खानने व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये बिग बी एक आर्ट इन्स्टिट्यूटाचे प्रमुख आहेत. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अमृता प्रयत्न करताहेत असे या व्हिडिओचे कथानक आहे.

अहमद सांगतो, ‘संध्याकाळी उशिरा आम्ही शटींग पूर्ण केली. ‘ओपेरा हाऊस’मधील अनेक ऐतिहासिक आणि मौल्यवान वस्तुंना हानी पोहचू नये म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आम्ही शूटींग केले.’

व्हिडीओमध्ये अमृता अतिशय निराळ्या, मात्र सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसल्या आहेत. बिग बीसुद्धा काळ्या सूटमध्ये उठून दिसत आहेत. हाय हिल्स आणि लाल रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
 खुद्द बिग बींनीही याबाबत ट्विट करत आपण एका व्हीआयपी सेलिब्रिटीसोबत शूट करत असल्याची माहिती देत शूटींग दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. वरिष्ठ बँक अधिकारी असलेल्या अमृता या उत्तम गायिका असून त्यांनी यापूर्वी प्रकाश झा यांच्या ' जय गंगाजल' चित्रपटासाठीही गायन केले होते. 

Web Title: Amrita Fadnavis Music Video with Big B