मलायकाची बहिण अमृता अरोराच्या जवळच्या व्यक्तीला झाली कोरोनाची लागण, बिल्डिंग केली सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:58 IST2020-06-12T17:57:35+5:302020-06-12T17:58:39+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा राहत असलेल्या इमारतीतही कोरोना पोहोचल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. कोरोना रूग्ण आढळल्यानंतर ही इमारत ...

Amrita Arora's Father-in-law Tested COVID-19 Positive | मलायकाची बहिण अमृता अरोराच्या जवळच्या व्यक्तीला झाली कोरोनाची लागण, बिल्डिंग केली सील

मलायकाची बहिण अमृता अरोराच्या जवळच्या व्यक्तीला झाली कोरोनाची लागण, बिल्डिंग केली सील

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा राहत असलेल्या इमारतीतही कोरोना पोहोचल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. कोरोना रूग्ण आढळल्यानंतर ही इमारत सील करण्यात आली आहे. मलायका वांद्रयातील टस्कनी अपार्टमेंटमध्ये राहते. मीडिया रिपोर्टनुसार,  हा कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मलायकाची बहिण अमृता अरोराचा सासरा आहे जो त्याच बिल्डींगमध्ये राहतो. अमृताच्या सासऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, अमृता अरोराचे सासरे एका नर्सच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. अमृताचे सासरे त्याच बिल्डींगमध्ये राहतात जिथे तिची बहिण मलायका राहते. अमृताचे सासरे टस्कनी बिल्डींगच्या 6 व्या मजल्यावर राहतात जी बीएमसीने सील केली आहे. याबाबत अमृताने सांगितले की, आता ते ठिक आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, मलायकाची जी बिल्डींग सील करण्यात आली होती. त्याच बिल्डींगमध्ये सोफी चौधरीही राहते. सोफीने तिथला एक व्हिडीओदेखील शेअर केला होता की, तिथला परिसर कसा साफ केला जात आहे हे त्यात दिसत होते.

Web Title: Amrita Arora's Father-in-law Tested COVID-19 Positive