या पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटरवर लट्टू झाली होती‘बॉलिवूडच्या मुन्नी’ची बहिण अमृता अरोरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 11:26 IST2017-11-08T05:56:02+5:302017-11-08T11:26:02+5:30

क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन्हींबाबत भारतीयांमध्ये प्रचंड जिव्हाळा आहे. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांवर रसिक जीवापाड प्रेम करतात. क्रिकेट आणि ...

Amrita Arora, sister of Bollywood's 'Munni', was hanged on the Pakistani-born cricketer! | या पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटरवर लट्टू झाली होती‘बॉलिवूडच्या मुन्नी’ची बहिण अमृता अरोरा!

या पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटरवर लट्टू झाली होती‘बॉलिवूडच्या मुन्नी’ची बहिण अमृता अरोरा!


/>क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन्हींबाबत भारतीयांमध्ये प्रचंड जिव्हाळा आहे. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांवर रसिक जीवापाड प्रेम करतात. क्रिकेट आणि बॉलिवूड अगदी सुरुवातीच्या काळापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. क्रिकेटच्या मैदानात मॅच पाहण्यासाठी बॉलिवूड कलाकार आवर्जून हजर असतात.तर बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये क्रिकेटर्स सामील होतात. क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. गेल्या अनेक वर्षांत क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रेमाचं नातंही जुळलं आहे. क्रिकेटर्सवर अनेक बॉलिवूडच्या अभिनेत्री फिदा झाल्याची उदाहरणं आहेत.क्रिकेटर्स आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगत असतात. रवी शास्त्री आणि अमृता सिंह इथपासून ते आजच्या विराट कोहली-अनुष्कापर्यंत अशा अनेक क्रिकेटर्स-बॉलिवूड अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगल्या आहेत. यांत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो नीना गुप्ता-सर व्हिवियन रिचर्ड्स, झहीर खान-इशा शेरवानी, युवराज-किम शर्मा, युवराज-दीपिका, नगमा-सौरव गांगुली अशा अनेक अफेअर्सच्या चर्चा कायम ऐकायला मिळाल्या आहेत. अशाच आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेटरवर लट्टू झाली होती. अभिनेत्री अमृता अरोरा आता शकील लडाकसह रेशीमगाठीत अडकली असली तरी कधी काळी तीही एका क्रिकेटरच्या प्रेमात बुडाली होती.पाकिस्तानी वंशाचा इंग्लड टीमचा क्रिकेटर उस्मान अफझलसह अमृताचं अफेअर सुरु होतं. एका कॉमन मित्राच्या पार्टीत अमृता आणि उस्मानची भेट झाली आणि पहिल्याच भेटीत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर अमृता आणि उस्मानमध्ये प्रेमाचे बंध आणखी घट्ट बनू लागले. विविध बॉलिवूड पार्ट्या आणि कोणत्याही सोहळ्यात अमृता-उस्मान हातात हात घालून फिरु लागले.अभिनेत्री रिना रॉय आणि पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान यांनी लग्न केल्यानंतर अमृताच्या रुपाने आणखी एक बॉलिवूड पाकिस्तानी क्रिकेटरसह रेशीमगाठीत अडकली जाणार अशा चर्चा त्यावेळी रंगू लागल्या. जवळपास चार वर्ष दोघांचं हे अफेअर सुरु होतं. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यामुळेच दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. उस्मान अफजल 2001 साली इंग्लड क्रिकेट टीमकडून खेळला होता.तसंच इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्येही झळकला होता. तर अमृता अरोरा ही बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा खानची बहिण आहे. दोघी बहिणींमध्ये प्रचंड जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळेच अमृता आणि उस्मानच्या अफेअर्सच्या चर्चा बी-टाऊनमध्ये चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र याआधीच्या बॉलिवूड अभिनेत्री-क्रिकेटर्स अफेअर्सप्रमाणे अमृता आणि उस्मानच्या प्रेमाची कहानीही अधुरीच राहिली. यानंतर अमृताने शकील लडाकसह लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.  

Web Title: Amrita Arora, sister of Bollywood's 'Munni', was hanged on the Pakistani-born cricketer!