​ भोजपुरी इंडस्ट्रीवर आम्रपाली दुबेचा ‘कब्जा’! यंदाचे वर्ष तिचेच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 15:09 IST2018-04-20T09:39:31+5:302018-04-20T15:09:31+5:30

हे वर्ष केवळ भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिचेचं आहे. होय, यंदा भोजपुरी इंडस्ट्रीत केवळ आणि केवळ आम्रपाली दुबे हिचेच ...

Amrapali Dubey's 'occupation' on Bhojpuri industry! This year only !! | ​ भोजपुरी इंडस्ट्रीवर आम्रपाली दुबेचा ‘कब्जा’! यंदाचे वर्ष तिचेच!!

​ भोजपुरी इंडस्ट्रीवर आम्रपाली दुबेचा ‘कब्जा’! यंदाचे वर्ष तिचेच!!

वर्ष केवळ भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिचेचं आहे. होय, यंदा भोजपुरी इंडस्ट्रीत केवळ आणि केवळ आम्रपाली दुबे हिचेच नाव दिसणार आहे. याला कारणही तसेच आहे. यंदा आम्रपालीचे एक नाही, दोन नाही तर तब्बल ८ सिनेमे रिलीज होत आहेत. म्हणजे भोजपुरी बॉक्सआॅफिसवर केवळ आम्रपालीचाचं जलवा दिसणार आहे.
आम्रपाली ही भोजपुरीची नंबर वन अभिनेत्री आहे. सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते. एका चित्रपटासाठी आम्रपाली ८ ते ९ लाख रूपये मानधन घेते, असे कळते. शानदार अभिनय, डान्स आणि एक वेगळीच अदा यामुळे तिची लोकप्रीयता दिवसागणिक वाढते आहे. यु ट्यूबवरील तिची गाणी आवडणा-या लोकांचा आकडा बघितला की, आपल्याला आम्रपालीच्या लोकप्रीयतेचा अंदाज येतो. 

आम्रपालीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती छोट्या पडद्यावर दिली आणि २०१४ मध्ये ‘निरहुआ हिंदुस्तानी’ या भोजपुरी चित्रपटातून तिने भोजपुरी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि आम्रपाली रातोरात स्टार झाली.गत तीन वर्षांत दीड डझनावर सिनेमांमध्ये ती दिसली आहे. यानंतर  पटना से पाकिस्तान , राजा बाबू ,  बम बम बोल रहा है , काशी  हे तिचे चित्रपटही हिट झालेत. गतवर्षी आलेल्या आम्रपालीच्या  मोकामा जीरो किलोमीटर  या  गाण्याला २ कोटींवर व्ह्यूज मिळाले होते. आम्रपालीने एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, लहानपणी तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. पण मायानगरी मुंबईत आल्यानंतर तिचे पाऊले मॉडेलिंगकडे वळलीत. केवळ उण्यापुºया चार वर्षांत आम्रपालीने एक मोठा पल्ला गाठला. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह आणि दिनेश लाल यादवसोबत तिची जोडी प्रचंड लोकप्रीय आहे.आम्रपाली दिनेशलाल यादवला डेट करत असल्याचीही चर्चा आहे.

ALSO READ : आम्रपाली दुबेच्या ‘या’ भोजपुरी गाण्याने तोडलेत सगळे विक्रम; तुम्हीही पाहा!
 

Web Title: Amrapali Dubey's 'occupation' on Bhojpuri industry! This year only !!