७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:23 IST2025-06-10T11:22:54+5:302025-06-10T11:23:19+5:30
अमोल पराशरच्या 'ग्राम चिकित्सालय' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला कोंकणा सेनने हजेरी लावली होती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. मात्र, ७ वर्षांनी मोठ्या कोंकणाला डेट करण्याबाबत अमोलने मौन सोडलं आहे.

७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पराशर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात आहे. अमोल पराशरच्या 'ग्राम चिकित्सालय' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला कोंकणा सेनने हजेरी लावली होती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. यावर अद्याप कोंकणाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ७ वर्षांनी मोठ्या कोंकणाला डेट करण्याबाबत अमोलने मौन सोडलं आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अमोलने कोंकणा सेनसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर भाष्य केलं. तो म्हणाला, "कोणीही मला याबाबत विचारलं नाही. उलट सगळ्यांनी त्यांची त्यांची मतं बनवली. सुरुवातीला मी प्रत्येक न्यूजवर प्रतिक्रिया द्यायचो. पण, आता मी याकडे फार लक्ष देत नाही. जर तसं काही असेल आणि मला शेअर करावंसं वाटलं तर मी स्वत: ते सोशल मीडियावर शेअर करेन. तुमच्या आयुष्यात अनेक लोक येतात. कोणाच्या तुम्ही जास्त जवळ असता तर कोणाच्या नाही. प्रत्येक रिलेशनला नाव देणं गरजेचं नाही".
"सरदार उधम सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी विक्की कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत होते. लोक मला विक्कीच्या रिलेशनशिपबाबत विचारायचे. त्यामुळे मी विक्कीला म्हणायचो की तू तिचा स्वीकार कर. तेव्हा विक्की मला म्हणाला होता की योग्य वेळ आल्यावरच मी तसं करेन", असंही त्याने सांगितलं. लग्नाबाबतही त्याने भाष्य केलं. लग्न झालं तर तेदेखील मी सोशल मीडियावर पोस्ट करेन, असं अमोलने सांगितलं.
कोंकणा सेन शर्मा आणि अमोल पाराशर यांच्यामध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. कोंकणा अमोलपेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे. ती ४५ वर्षांची आहे तर अमोल ३८ वर्षांचा आहे. गेल्या वर्षी अमोलने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. पण, त्याने गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं नव्हतं. दरम्यान, कोंकणाने २०१०मध्ये रणवीर शौरीसोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांतच ते वेगळे राहू लागले. आणि २०२० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना १४ वर्षांचा मुलगा आहे.