अमला पॉलचे न्यूड सीन असलेला चित्रपट झाला ऑनलाईन लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 18:32 IST2019-07-24T18:32:32+5:302019-07-24T18:32:49+5:30
अमला पॉल अभिनीत तमीळ चित्रपट 'आदाई' यावर्षीचा वादग्रस्त चित्रपट ठरला. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अमला पॉलचे न्यूड सीन असलेला चित्रपट झाला ऑनलाईन लीक
अमला पॉल अभिनीत तमीळ चित्रपट 'आदाई' यावर्षीचा वादग्रस्त चित्रपट ठरला. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा एचडी प्रिंट पायरेसी साइटवर लीक करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर त्याचा परिणाम पडणार आहे. आदाई बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत आहे.
आदाई चित्रपटाची कथा कामिनी नामक मुलीभोवती फिरते. तिला आपल्या अटींवर जीवन व्यतित करायचे असते. एक दिवस ऑफिस पार्टीत एक घटना घडते. त्यानंतर तिचं आयुष्य बदलून जातं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट ऑनलाईन साईटवर लीक झाला आहे.
अमाला पॉल आदाईमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात अमालानं बलात्कार पीडितेची भूमिका साकारली आहे. स्क्रीप्टनुसार अमाला हिला न्यूड शूट करावं लागलं. मागील काही दिवसांपूर्वी चित्रपटातील न्यूड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अमालाने या चित्रपटातील सीनवर खुलासा केला.
अमालाने चित्रपटातील सीनबद्दल द हिंदूला सांगितलं की, मी आदाई चित्रपटाचे दिग्दर्शक रत्ना कुमारला विचारले होते की सीन कसा असेल. कारण शूट करण्यापूर्वी मी खूप विचार करत होते.
अमाला म्हणाली की, मला या गोष्टीची चिंता वाटत होती की हे सगळं कसं होईल, सेटवर शूटिंगच्या वेळी किती लोक असती. चित्रीकरणावेळी फक्त १५ लोक उपस्थित होते. माझ्या संपूर्ण टीमवर विश्वास होता. त्यामुळे सीन करण्यासाठी तयार झाली.
सोशल मीडियावर न्यूड सीनमुळे खूप वाद झाले. सोशल मीडियावरील युजर्सनं ट्रोल केलं होतं. काही सेलेब्रिटी पुढे सरसावले आणि अमालाचं कौतूक केलं होतं.