​कठुआ प्रकरणावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया ऐकून असे भडकले युजर्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 16:19 IST2018-04-20T10:44:52+5:302018-04-20T16:19:49+5:30

अमिताभ बच्चन सध्या ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलीकडे या चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये बिग बींनी हजेरी ...

Amitabh Bachchan's response to the Kadua issue: | ​कठुआ प्रकरणावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया ऐकून असे भडकले युजर्स!!

​कठुआ प्रकरणावर अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया ऐकून असे भडकले युजर्स!!

िताभ बच्चन सध्या ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अलीकडे या चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये बिग बींनी हजेरी लावली. यावेळी ‘१०२ नॉट आऊट’शिवाय अन्य मुद्यावरही बिग बींना अनेक प्रश्न विचारण्यात आलेत. यातील एक प्रश्न होता, कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणासंदर्भातला. मीडियाने या घटनांवर बिग बींची प्रतिक्रिया विचारली, पण अमिताभ यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ‘मला बलात्कारासाररख्या घटनांवर बोलण्यास लाज वाटते. असे प्रश्न विचारू नका,’असे अमिताभ म्हणाले.  अमिताभ यांचे हे उत्तर ऐकून मीडियाने तर आवरते घेतले. पण सोशल मीडियावरचे युजर्स मात्र खवळले. अमिताभ बच्चन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारख्या अभिनयांना पाठींबा देतात, या अभियानात हिरहिरीने भाग घेतात. असे असताना बलात्काराच्या घटनांवरचे त्याचे हे उत्तर ऐकून युजर्स भडकले. अनेक युजर्सनी आपला हा संताप बोलून दाखवला. ‘अमिताभ पिंक सारखे चित्रपट बनवतात. अशास्थितीत कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणावर त्यांच्याकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती,’ असे एका युजरने लिहिले. ‘पिंक आला तेव्हा तर खूप बोलले, आता का नाही? हा आहे बॉलिवूडचा खरा चेहरा’, अशी खोचक प्रतिक्रिया एका युजरने दिली.


ALSO READ : SEE PICS : ​कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरण : गर्दीतील एक होऊन रस्त्यावर उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी!

कथुआ व उन्नाव प्रकरणावरून राजकीय नेते, क्रीडापटू, कलावंत अशा समाजातील विविध क्षेत्रांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाºया दोषींना फासावर चढवले जायला हवे,दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. बॉलिवूडमधील अनेकांनी रस्त्यावर उतरत या घटनांचा निषेध नोंदवला आहे. रेणुका शहाणे, सोनम कपूर, रिचा चड्ढा, गुल पनाग, करिना कपूर, स्वरा भास्कर,अभिनेता रणदीप हुड्डा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनांविरोधात आवाज उठवला आहे. हो, मी हिंदुस्तान आहे आणि आज मलाही लाज वाटतेय, अशी पोस्टर या सेलिब्रिटींनी झळकवलीत.  

Web Title: Amitabh Bachchan's response to the Kadua issue: