अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे’वर रेखाने लावले ठुुमके...पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 16:00 IST2017-11-29T10:30:13+5:302017-11-29T16:00:13+5:30
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा हिच्याकडे बघताना आजही पापणी लवत नाही. खरे तर रेखा फार कमी रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावते. ...

अमिताभ बच्चन यांच्या ‘रंग बरसे’वर रेखाने लावले ठुुमके...पाहा फोटो!!
ब लिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा हिच्याकडे बघताना आजही पापणी लवत नाही. खरे तर रेखा फार कमी रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावते. पण अलीकडे रेखाने ‘सुपर डान्सर2’च्या शो सेटवर हजेरी लावली.
![]()
रेखा या शोवर आली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पिंक कलरची सिल्कची भरजरी साडी, लालचुटूक ओठ, भांगात लाल कुंकू अशा नेहमीच्या अंदाजात रेखा मंचावर आली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. या शोची जज शिल्पा शेट्टी हिने रेखाचे शोवर आल्याबद्दल शानदार स्वागत केले. यावेळी शिल्पाने रेखाला ‘रेखा माँ’ असे संबोधले.
![]()
![]()
या रिअॅलिटी शोच्या मंचावर शेखा सर्व स्पर्धकांना प्रेरणा देताना दिसली. रेखाला मुले आवडतात. कदाचित त्याचमुळे लहान मुलांच्या या रिअॅलिटी शोमध्ये तिने हजेरी लावली. आता डान्सच्या शोवर आल्यानंतर डान्स तर बनतोच.
![]()
ALSO READ : ‘या’ व्यक्तिमुळे नर्व्हस असूनही रेखाला मीडियापुढे यावे लागले!
रेखानेही ‘सुपर डान्सर2’च्या मंचावर ठेका धरला. शोदरम्यान रेखाने स्वत:च्या काही हिट गाण्यांवर डान्स केला. सोबतच अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या तिच्या ‘रंग बरसे’ या सर्वाधिक लोकप्रीय वरही ठेका धरला. अमिताभ यांच्या गाण्यावर रेखाला थिरकताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला नसेल तर नवल.
रेखाच्या नावाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा अमिताभ बच्चन हे नाव आपसुकच ओठांवर येते. रेखा आणि अमिताभ यांची जोडी सगळ्यात बी-टाऊनमधील चर्चेत जोडी होती. तो काळ या जोडीने खूप गाजवला होता. एक वेळ अशी ही आली की, रेखा अमिताभ यांच्याशिवाय तर अमिताभ रेखाशिवाय अधुरे म्हणवले गेले. दोघांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली. अमिताभ जयाला सोडून रेखाशी लग्न करणार अशा बºयाच चर्चा देखील झाल्या. मात्र अमिताभ यांनी कधीच जया बच्चन यांची साथ सोडली नाही. आज दोघे एकमेंकासमोर कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात आणि अॅवॉर्ड सोहळ्यात येणे टाळतात.