अमिताभ बच्चन करताहेत नागराज मंजुळेच्या 'ह्या' सिनेमात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 14:16 IST2018-11-12T14:15:26+5:302018-11-12T14:16:14+5:30

'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते अमिताभ बच्चन व दिग्दर्शक नागराज मंजुळे एकत्र काम करणार आहेत.

Amitabh Bachchan work with Nagraj Manjule in this film | अमिताभ बच्चन करताहेत नागराज मंजुळेच्या 'ह्या' सिनेमात काम

अमिताभ बच्चन करताहेत नागराज मंजुळेच्या 'ह्या' सिनेमात काम

ठळक मुद्देअमिताभ बच्चन क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत फुटबॉल या खेळाभोवती आधारीत झुंड चित्रपट

बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे एकत्र चित्रपट करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगली होती.
या चर्चेला अखेर अमिताभ बच्चन यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ट्विटरवर नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट 'झुंड'मध्ये काम करत असल्याचे सांगितले आहे. 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लिहिले की, 'नागराज मंजुळेच्या चित्रपटात काम करत असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात करू.' इतकेच नाही तर त्यांनी नागराज मंजुळे आणि सुधाकर रेड्डी यंकट्टी यांच्या नाळ सिनेमाचा ट्रेलरसुद्धा शेअर केला  आहे.




येत्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून नागपुरात झुंड सिनेमाचे चित्रीकरण सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. ते नागपूरमध्ये सलग 45 दिवस या सिनेमाचे शूटींग करणार आहेत. तसेच संपूर्ण सिनेमाचे 70-80 दिवसांत पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नागराज मंजुळेसुद्धा प्रचंड उत्सुक आहेत. ते स्वत: बिग बींचे खूप मोठे चाहते आहेत. एका क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत बिग बी आपल्यासमोर या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येतील. फुटबॉल या खेळाभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन व नागराज मंजुळे यांचा चित्रपट पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Amitabh Bachchan work with Nagraj Manjule in this film